दिघंचीत बाजार समितीच्या पेट्रोलपंपाचे काम गतीने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:33+5:302021-04-11T04:25:33+5:30

अमोल काटे दिघंची : आटपाडी तालुक्यात बाजार समितीमार्फत दिघंची, खरसुंडी व करगणी या तीन ठिकाणी बाजार समितीचे पेट्रोलपंप सुरू ...

Work on petrol pump of Dighanchit Bazar Samiti started at a fast pace | दिघंचीत बाजार समितीच्या पेट्रोलपंपाचे काम गतीने सुरू

दिघंचीत बाजार समितीच्या पेट्रोलपंपाचे काम गतीने सुरू

अमोल काटे

दिघंची : आटपाडी तालुक्यात बाजार समितीमार्फत दिघंची, खरसुंडी व करगणी या तीन ठिकाणी बाजार समितीचे पेट्रोलपंप सुरू करण्यात येणार आहेत. दिघंची येथील पेट्रोलपंपाचे काम गतीने सुरू असून लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हा पेट्रोलपंप सुरू होईल, अशी माहिती सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी दिली.

दिघंची (ता. आटपाडी) येथील बाजार समितीच्या पेट्रोलपंपाच्या कामाची पाहणी गायकवाड यांनी केली. यावेळी ते बोलत होते. गायकवाड म्हणाले, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे पेट्रोल मिळावे, ग्रामीण भागातील नागरिकांची सोय व्हावी म्हणून बाजार समितीच्या पेट्रोलपंपासाठी सतत प्रयत्न सुरू होता. अखेर त्याला यश आले.

अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची पेट्रोलपंपाची मागणी होती. ग्रामीण भागातील शेतकरी हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बनविण्यात आलेल्या यंत्राचे वापर करीत असल्याने त्यांना इंधनाची अत्यंत आवश्यकता असते. यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाने पाठपुरावा करून पंप मंजूर करून घेतले आहेत. यासाठी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आजी-माजी पदाधिकारी व सर्व संचालकांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

यावेळी उपसभापती दिलीप खिलारी, सचिव शशिकांत जाधव व संचालक उपस्थित होते.

Web Title: Work on petrol pump of Dighanchit Bazar Samiti started at a fast pace