शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: म्हैसाळ येथील बॅरेजमुळे शेतकऱ्यांचे संकट गहिरे, नेमके पाणी किती अडणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:00 IST

नदीकाठच्या गावकऱ्यांत भीती

सुशांत घोरपडेम्हैसाळ : कर्नाटक शासन अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयावर ठाम असून, दुसरीकडे जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेजवळ नवीन एक टीएमसी बॅरेज उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पाणी पातळी जास्त राहिली तर कृष्णा खोऱ्यातील नदीकाठच्या गावांवर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावातील शेतजमिनी पाण्याखाली जाण्याची भीती अनेक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या काही गावांचा समावेश आहे.हे प्रकल्प झाल्यानंतर पाणी किती अडणार ? नदीची पाणी पातळी किती राहणार ? पावसाळ्यात पाणी पातळी किती असणार ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.म्हैसाळ येथे बांधल्या जाणाऱ्या नव्या बॅरेजमुळे मागे कसबे डिग्रजपर्यंत बँक वॉटरची पातळी वाढणार असून म्हैसाळ, कनवाड, कुटवाड, ढवळी, अर्जुनवाड या गावातील शेतजमिनी जलमय होण्याची भीती आहे.यांचा फटका शेतकऱ्यांबरोबर व्यापारी व लघुउद्योग क्षेत्रालाही बसणार आहे. "सिंचनाचे फायदे काही मर्यादित ठिकाणी होत असले तरी त्याचा खालच्या भागातील जनजीवनावर मोठा विपरित परिणाम होणार आहे," असे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने भविष्यात होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करूनच पुढील पावले टाकावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पावसाळ्यामध्ये जलसंपदा विभाग हा धरणातील गेट खुले करते, त्यामुळे म्हैसाळ येथे नव्याने होत असलेल्या बॅरेजमुळे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. - प्रभाकर केंगार, सेवानिवृत्त, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग, सांगली 

एकीकडे अलमट्टी धरणाची उंची कर्नाटक सरकार वाढवत आहे. दुसरीकडे म्हैसाळ येथे नवीन बॅरेजचे काम सुरू आहे.हे दोन्ही प्रकल्प झाल्यानंतर पावसाळ्यात नेमके पाणी किती अडणार ? नदी पात्रात पाणी पातळी किती राहणार ? याबाबत कोणतीही कल्पना आम्हाला नाही. पावसाळ्यात पाणी पातळी जास्त राहिल्यास आम्हा शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. - एम. डी. पाटील, शेतकरी, म्हैसाळ