शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘शक्तिपीठ’ रद्दसाठी सांगलीतील महिलांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:50 IST

आजपर्यंत क्षीरसागर गप्प का होते?

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी बुधगाव (ता. मिरज) येथील महिला शेतकऱ्यांनी मंगळवारी स्वत:च्या रक्ताने पोस्टकार्ड लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली. आम्हाला भूमिहीन करून शक्तिपीठ महामार्ग कशासाठी करत आहे? असा सवालही महिलांनी उपस्थित केला आहे.बाधित शेतकऱ्यांची महिलासह बुधगाव येथील विठ्ठल मंदिरात बैठक झाली. या ठिकाणी एकत्र येऊन महिला शेतकऱ्यांनी आपले रक्त बाटलीत काढले व बोरुने माझी जमीन बागायती आहे. सर्व जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा योजना तयार केल्या आहेत. त्यामुळे माझी जमीन प्रस्तावित महामार्गासाठी द्यायची नाही. तसेच या महामर्गामुळे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागास महापुराचा धोका वाढणार आहे. सर्व देवस्थाने रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडावीत अशा आशयाची पत्रे लिहिली.

किसानसभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही, असे विधान केले होते. तसेच कोल्हापूरमध्ये आमदार क्षीरसागर यांनीही शक्तिपीठ महामार्ग होणारच असे विधान केले आहे. आजपर्यंत क्षीरसागर गप्प का होते?. कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसूचना रद्द केल्यानंतरही ते बोलले नाहीत? शक्तिपीठचे समर्थन करण्याचा आत्मविश्वास त्यांना आत्ताच कोठून आला? हिम्मत होती तर निवडणूक प्रचारात त्यांनी हे विधान करायचे होते.सर्व आमदारांशी चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणतायत मग सांगलीचे आमदार, खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात कसे सहभागी होतात. याचे उत्तर मुख्यमंत्री देतील काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठविली आहेत. ती त्यांनी वाचली नाहीत का? असे संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, उमेश एडके, प्रवीण पाटील, आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, अनिल डुबल, रामदास पाटील, वैशाली पाटील सरपंच, शुभांगी शिंदे, उपसरपंच वनिता पाटील, तृप्ती पाटील, सुषमा पाटील आदी उपस्थित होते.

घरादारावर नांगर फिरविण्याची धोरण बदला : महेश खराडेविकासाच्या गप्पा मारून शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचे राज्य सरकारची धोरण असून ते उधळून लावले जातील. विकासाचे कारण पुढे करुन शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नाही, असा आरोपही महेश खराडे यांनी केला.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गChief Ministerमुख्यमंत्री