शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

Sangli: फाळकेवाडीत महिला सरपंचाला काठीने मारहाण, परस्परविरोधी फिर्यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:32 IST

आष्टा : फाळकेवाडी ता. वाळवा येथे वादग्रस्त बांधकामाबाबत ग्रामपंचायती मध्ये मीटिंग बोलवल्याच्या रागातून सरपंचाच्या पतीसह ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला लाथा ...

आष्टा : फाळकेवाडी ता. वाळवा येथे वादग्रस्त बांधकामाबाबत ग्रामपंचायती मध्ये मीटिंग बोलवल्याच्या रागातून सरपंचाच्या पतीसह ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करण्यात आली. तसेच सरपंच व सदस्यांना शिवीगाळ करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. २८) फाळकेवाडी एसटी स्टँड जवळ घडली. मारहाणीबाबत आष्टा पोलीस ठाण्यात विपुलचंद व ऋषिकेश फाळके यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.विपुल बाबासाहेब चंद यांची पत्नी शुभांगी ही ग्रामपंचायत फाळकेवाडी ची सदस्य तर चुलत भाऊ विकास विठ्ठल चंद याची पत्नी प्राजक्ता चंद या विद्यमान लोकनियुक्त सरपंच आहेत फाळकेवाडी गावामध्ये संदीप विश्वनाथ आपुगडे यांचे वादग्रस्त बांधकाम सुरू आहे त्याबाबतचा तक्रार अर्ज ग्रामपंचायत मध्ये आला होता त्या अनुषंगाने ग्रामपंचायत मिटिंग बोलवण्यात आली होती सचिन काटकर यांनी विपुल यांना फोन करून ''काय रे विपुल तुला आणि तुझा भाऊ विकास तुम्हाला लय मस्ती आली आहे काय मीटिंग कशाला घेताय ग्रामपंचायतीकडे या तुम्हाला दाखवतो जिवंत ठेवत नाही'' अशी धमकी दिली होती

विपुल पत्नी शुभांगी व विकास सरपंच पत्नी प्राजक्ता यांना मोटरसायकलवर घेऊन ग्रामपंचायतीकडे जात असताना बस स्टॅन्ड जवळ आले असता सचिन काटकर याने विपुल याला पकडून गाडीवरून खाली ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तसेच तेथे असलेल्या विजय काटकर ,हर्षल काटकर, राहुल आदिनाथ काटकर, सागर फाळके व एका अनोळखी इसमाने विपुल व विकास यांना लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी सागर फाळके यांनी विकासच्या डोक्यात काठी मारल्याने तो जखमी झाला यावेळी मोटरसायकल क्रमांक एम एच १० डी ४०२३ चे दहा हजारचे नुकसान केले. सचिन माने आणि सरपंच प्राजक्ता चंद, शुभांगी चंद भांडणे सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आला त्यानंतर सर्वजण निघून गेले.दरम्यान ऋषिकेश उत्तम फाळके यांनीही विपुल,चंद, भास्कर चंद, विकास चंद, सचिन आपुगडे ,सचिन माने यांनीही वादग्रस्त बांधकामाच्या कारणावरून ऋषिकेश फाळके व राहुल काटकर यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस