शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: नेवरीत कौटुंबिक वादातून महिलेचा खून; पती गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 14:28 IST

पती गंभीर : सासू, दीर जावेसह चौघेजण ताब्यात

कडेगांव : नेवरी (ता. कडेगाव) येथे महिलेचे डोके दगडाने ठेचून, गळ्यावर, डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. महिलेचा पती व चुलत दीरावरही वार केल्याने तेही गंभीर जखमी झाले. प्रियांका अजय महाडिक (वय २५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.अजय आप्पासाहेब महाडिक (३०) व नवनाथ बाबूराव महाडिक (४५) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. अजय यास विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत कडेगाव पोलिसांत नोंद झाली आहे.याप्रकरणी महिलेची सासू तारामती आप्पासाहेब महाडिक, दीर शरद आप्पासाहेब महाडीक, जाऊ उज्ज्वला शरद महाडीक, पुतण्या अभिषेक शरद महाडिक या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.नेवरी येथे शेडवस्तीनजीक महाडीक कुटुंब राहते. शरद व अजय हे सख्खे भाऊ आहेत. शरदचा मुंबई येथे रिक्षाचा व्यवसाय आहे. तो पंधरा दिवसांपूर्वी नेवरी येथे आला आहे शनिवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबांत भांडण सुरू झाले. रागाच्या भरात दीर शरद आणि पुतण्या अभिषेक याने धारदार शस्त्राने प्रियांकाच्या डोक्यावर व गळ्यावर तसेच तिचा पती अजयच्याही डोक्यावर वार केले. त्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला, तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मयत महिलेचा चुलत दीर नवनाथ महाडिक जखमी झाला. त्यास स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस