पाणी आल्याशिवाय माघारी हटणार नाही
By Admin | Updated: July 16, 2014 00:01 IST2014-07-15T23:53:32+5:302014-07-16T00:01:20+5:30
शेतकऱ्यांचा निर्धार : डोंगरवाडी योजनेचा वाद

पाणी आल्याशिवाय माघारी हटणार नाही
सोनी : डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या संघर्ष समितीची करोली (एम) येथे बैठक पार पडली. यामध्ये गावकऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करत पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पडल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा निर्धार करण्यात आला.
शेतकऱ्यांना डोंगरवाडी योजनेतून म्हैसाळ कालव्याचे पाणी तात्काळ द्यावे, यासाठी करोली (एम), सोनी, पाटगावसह ११ गावांतील नागरिकांनी उठाव केला असून, त्यासाठीची बैठक करोली येथे पार पडली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाण्यासाठीची ही लढाई आता मोठ्या प्रमाणात लढायची आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे. याला उपस्थित गावकऱ्यांनी पाठिंबा व्यक्त केला व पाण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी व्यक्त केली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, करोलीचे माजी सरपंच शिवाजी पाटील, भानुदास पाटील, सोनीचे अरविंद पाटील, टी. आर. पाटील, राहुल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)