रयत पॅनलला उचांकी मताधिक्याने विजयी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:26+5:302021-06-28T04:19:26+5:30
वांगी : यशवंतराव मोहिते यांचे सहकार चळवळीत खूप मोठे योगदान आहे. त्यांचा वारसा खंबीरपणे चलविणाऱ्या इंद्रजित मोहिते यांच्या रयत ...

रयत पॅनलला उचांकी मताधिक्याने विजयी करा
वांगी :
यशवंतराव मोहिते यांचे सहकार चळवळीत खूप मोठे
योगदान आहे. त्यांचा वारसा खंबीरपणे चलविणाऱ्या इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनलला उच्चांकी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
वांगी (ता. कडेगाव) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम,
सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, बापूसाहेब मोरे उपस्थित होते.
विश्वजित कदम म्हणाले, की माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात यशवंतराव मोहिते यांनी आधार दिला. हाच आधार दुष्काळी भागाच्या विकासाचा पाया आहे. यशवंतराव मोहिते यांनी घाटमाथ्यावर केलेल्या सभासदावर अन्याय करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.
ऊसतोड न देणे, साखर न देणे, मयत सभासदाच्या वारसाच्या नोंद केल्या नाहीत. रयत पॅनल सत्तेत आल्या आल्या ८ हजार मयत सभासदांच्या नोंदी करणार आहेत. तरी सर्वांनी रयत पॅनलला उच्चांकी मताधिक्याने विजयी करूया.
यावेळी सरपंच डॉ. विजय होनमाने, विजय मोहिते, युवराज कदम, निवृत्ती मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुरेश मोहिते, दिलीप सूर्यवंशी, मोहन मोरे, उपसरंपच सजंय कदम उपस्थित होते.
चौकट
नैतिक अधिकार नाही
ज्यांनी सहकार तत्त्वावरील कारखाना मोडित काढून खाजगी केला, ज्यांच्या कारखान्याची थकीत ऊस बिले काढण्यासाठी शेतकऱ्यांना
आंदोलन करावे लागते, ते नेते सहकार पॅनलच्या प्रचारात उतरले आहेत. वास्तविक या नेतेमंडळींना सहकारी कारखानदारीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला विश्वजित कदम यांनी नाव न घेता लगावला.