शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेते, एजंटांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार, कामगार मंत्री डाॅ. खाडे यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 08:53 IST

Maharashtra Government: वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्र वितरणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. वृत्तपत्र वितरणात विक्रेते, एजंटचे योगदान मोठे आहे. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता त्यांचे काम विनासुट्टी सुरू असते. त्यामुळे त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितच सर्वतोपरी प्रयत्न करू.

सांगली - वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्र वितरणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. वृत्तपत्र वितरणात विक्रेते, एजंटचे योगदान मोठे आहे. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता त्यांचे काम विनासुट्टी सुरू असते. त्यामुळे त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितच सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री डाॅ. सुरेश खाडे यांनी शनिवारी येथे दिला.

सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या जिल्हा मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मराठा समाज भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, राज्य अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र  टिकार यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

डाॅ. खाडे म्हणाले, असंघटित कामगारांसाठीच्या महामंडळातून विविध प्रकारचे लाभ घेण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनी नोंद करावी. जिल्ह्यात, तालुक्याच्या ठिकाणी वृतपत्र वितरणासाठी हाॅल उभारण्यासाठी (सेंटरशेड) निधी देऊ. आमदार सुधीर गाडगीळ यांनी  वृत्तपत्र विक्रेता भवन साठी १५ लाखाचा निधी देत  असल्याची घोषणा केली. तर सुनील पाटणकर यांनी सर्व संघटित क्षेत्रासाठी केलेल्या कल्याणकारी मंडळामध्ये आम्हाला न्याय मिळणार नाही त्यामुळे आमचे स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ करावे, अशी मागणी केली.आदर्श वृत्तपत्र विक्रेता पुरस्कारनारायण माळी, सुभाष चौगुले, प्रदीप आसगावकर, तुकाराम पाटील, सुभाष जाधव - मिरज, चंद्रकांत जोशी - नागठाणे, यांना आदर्श वृत्तपत्र विक्रेता म्हणून गौरविण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांना वृत्तपत्र वाटपासाठी मोफत पिशवीचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार