शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"पंचवीस वर्षांचा होईपर्यंत समोर काही शिल्लक ठेवत नाही", आर. आर. आबांच्या मुलाचा विरोधकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 15:03 IST

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ही निवडणूक स्वबळावर लढवत आहे. ही लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेतकरी विकास आघाडी अशी होत आहे.

सांगली : माझ्याविरोधात सगळे एकत्र आले आहेत, ही गोष्ट खरी आहे, पण मी आता २३ वर्षाचा आहे, पंचवीस वर्षाचा होईपर्यंत समोर काही शिल्लक ठेवत नाही, असा इशारा आर. आर. पाटील यांचे पूत्र व राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित पाटील यांनी विरोधकांना दिला.कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ही निवडणूक स्वबळावर लढवत आहे. महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेने या ठिकाणी भाजपशी आघाडी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेतकरी विकास आघाडी अशी लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी कवठेमहांकाळ येथे पदयात्रेने झाला.यावेळी प्रचार सभेत अनेक नेत्यांनी त्यांच्या भाषणात पंचवीस वर्षाच्या तरुणाला हरवण्यासाठी सर्व विरोधक एकवटल्याचे मत मांडले. हा धागा पकडत रोहित पाटील म्हणाले, आपण सगळ्यांनी सांगितले २५ वर्षाच्या तरुणाला हरवायला सगळे एकत्र आले आहेत, पण आता माझे वय २३ आहे, पण २५ वर्षाचा होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, असा इशारा विरोधकांना दिला.आर.आर. गट विरुद्ध सर्वतासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ दिवंगत राष्ट्रवादी नेते आर.आर. आबा पाटील यांचा गड मानला जातो. त्यांना खासदार संजयकाका पाटील यांच्याशी नेहमीच संघर्ष करावा लागला. त्याच मतदार संघातल्या कवठेमंकाळ नगरपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीला म्हणजेच आर.आर.पाटील गटाला नगरपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने आव्हान दिले आहे.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक