शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस सांगलीमार्गे धावणार?, सांगलीतील संघटनांकडून वेळापत्रकासह दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:36 IST

सांगली : तोट्यात असणारी कोल्हापूर -कलबुर्गी एक्स्प्रेसला सांगलीत थांबा दिल्यास ती फायद्याच्या ट्रॅकवर धावू शकते, असा विश्वास सांगलीतील प्रवासी, ...

सांगली : तोट्यात असणारी कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेसला सांगलीत थांबा दिल्यास ती फायद्याच्या ट्रॅकवर धावू शकते, असा विश्वास सांगलीतील प्रवासी, व्यापारी संघटनांनी दिला आहे. त्यादृष्टीने काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर नियोजित वेळापत्रकही तयार करून टाकले आहे.कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस गाडीतील अनेक तिकिटस् शिल्लक असतात. त्यामुळे ही गाडी सांगलीमार्गे चालवावी म्हणजे सांगलीचे अतिरिक्त प्रवासी या गाडीला मिळतील व गाडी भरून धावू लागेल. गाडीचे उत्पन्न वाढून ती फायदेशीर ठरेल, असे चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी सुचविले होते.कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या श्रेणीत मोडते. कोल्हापूर-कलबुर्गी गाडी सांगलीमार्गे धावली तर त्याला फक्त १५ मिनिटे जास्त वेळ लागणार. त्यामुळे ही गाडी सुपरफास्टच्या श्रेणीमधून एक्स्प्रेसच्या श्रेणीत जाईल. त्यामुळे या गाडीची तिकिटे ३० रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल व जास्त प्रवासी या गाडीतून प्रवास करतील, असाही दावा केला जात आहे.

समाजमाध्यमांवर टाकलेले वेळापत्रककोल्हापूरहून ही गाडी दुपारी २.२४ वाजता सुटून, हातकणंगले, जयसिंगपूर या स्थानकावरून मिरजेत दुपारी ३.४० ला येईल. पाच मिनिटे थांबून ती सांगलीत ३.५९ ला पोहचेल. सांगलीतून ४.२० वाजता ती निघून पुन्हा मिरजेत ४.३५ ला येईल. ४.४५ ला ती सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, सोलापूर, अक्कलकोट रोड, गाणगापूर रोड स्थानकावरून रात्री १०.४५ वाजता कलबुर्गीला पोहोचेल.परतीच्या प्रवासात सकाळी ६.४० वाजता कलबुर्गीतून निघालेली ही गाडी मंजूर थांबे करुन मिरजेत दुपारी १२.१० वाजता पोहचेल. तिथून सव्वा बारा वाजता सांगलीला रवाना होईल. सांगलीत १२.२८ वाजता पोहोचल्यानंतर १२.४३ ला ती मिरजेकडे रवाना होईल. मिरजेतून १.०२ मिनिटांनी ती कोल्हापूरकडे रवाना होईल. कोल्हापुरात दुपारी सव्वा दोन वाजता ती पोहोचेल.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूर