सांगली : पतीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मिरज पश्चिम भागातील गावात राहणाऱ्या तरुणीच्या घरात घुसून तोडफोड केली. कोयत्याने मोपेडची तोडफोड केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला.या प्रकरणी तरुणीने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक शितोळे, प्रतीक्षा शितोळे, निहाल बावा, काजल माने (रा. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.तरुणी आणि तिची आई मंगळवारी घरी असताना रात्री साडेअकराच्या सुमारास चौघे संशयित घरासमोर आले. गेटवरून चौघेजण आतमध्ये आले. संशयित प्रतीक आणि प्रतीक्षा यांच्या हातात कोयता होता. त्यांनी घराच्या आत आल्यानंतर दारात लावलेल्या मोपेडवर कोयत्याने हल्ला करत तोडफोड केली. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा लाथ मारून तोडला. घरात आल्यावर हॉलमधील साहित्याची तोडफोड केली. यावेळी संशयित प्रतीक्षा यांनी संबंधित फिर्यादी तरुणीला ‘तुझे माझ्या पतीबरोबर प्रेमसंबंध आहेत,’ असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर परिसरात नागरिक जमले. तेव्हा संशयित तेथून निघून गेले.
Sangli Crime: पतीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयाने पत्नी संतापली, तरुणीच्या घरात घुसून तोडफोड केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:13 IST