शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट घरकुलांची चौकशी करणार कोण?

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST

प्रशासन गांभीर्यहीन : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर सहा महिन्यांपासून कार्यवाहीच नाही

तासगाव : झोपडपट्टी निर्मूलनासाठी तासगाव नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून घरकुलांची उभारणी केली. मात्र या घरकुलांचा दर्जा निकृष्ट आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांचे आदेश सहा महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. त्यामुळे निकृष्ट घरकुलांची चौकशी करुन झोपडपट्टीधारकांना न्याय मिळवून देणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तासगाव शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने घरकुल योजना राबविण्यात आली. त्यासाठी केंद्र शासनाकडून साडेचार कोटींचा निधी मिळाला. घरकुल उभारणीचा ठेका देण्यात आला. साडेचार कोटी रुपये खर्ची पडले. ३९७ घरकुले उभारण्यात आली. मात्र या घरकुलांचे काम दर्जाहीन असल्याचे उघडकीस आले. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंंह कुशवाह यांच्याकडे जानेवारी महिन्यात तक्रार करण्यात आली होती. कुशवाह यांनी या तक्रारीची दखल घेत उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. समितीच्या माध्यमातून तासगाव, विटा व इस्लामपूर पालिकांच्या घरकुल योजनेतील कामाचा दर्जा, निधी खर्चाची सखोल चौकशी करण्यात येणार होती. या चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी चौकशीचे आश्वासन देऊनही अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ना चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली, ना नगरपरिषदांना चौकशीसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला. प्रशासकीय पातळीवर चौकशी व कारवाईबाबत टाळाटाळ होत आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांना गळक्या घरातच वास्तव्य करावे लागणार आहे. (वार्ताहर)ठेका एकास, काम दुसऱ्याचे! घरकुल योजनेच्या कामाचा ठेका शिरोळ येथील रोडलॅन्ड कंपनीने घेतला होता. प्रत्यक्षात मात्र हे काम दुसऱ्याच ठेकेदाराने केले असल्याची चर्चा आहे. राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय अनास्था यामुळेच या कामाचा दर्जा निकृष्ट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कारवाईकडे दुर्लक्ष झाले आहे.