शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचे ‘द्राक्ष संशोधन केंद्र’ नेमके कुठे अडकले?, विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विश्वजित कदम यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:13 IST

फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांची सकारात्मक भूमिका

कडेगाव : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सांगली येथे ‘द्राक्ष संशोधन केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आणि कृषी राज्यमंत्री आ. डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूदही करण्यात आली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर या संशोधन केंद्राच्या उभारणीची प्रक्रिया नेमकी कुठे अडकली, असा सवाल आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत केला.विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार विश्वजित कदम यांनी हा मुद्दा उपस्थित करत, “सांगलीच्या द्राक्ष उत्पादकांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही; संशोधन केंद्र प्रत्यक्षात उभे राहिले पाहिजे,” अशी ठाम भूमिका मांडली.सांगली जिल्हा राज्यातच नव्हे तर देशातही द्राक्ष उत्पादनासाठी अग्रस्थानी मानला जातो. जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, पलूस आणि जत या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर द्राक्षलागवड होते. त्यातही तासगाव तालुका बेदाणा उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. या संपूर्ण पट्ट्यातून निर्यातक्षम दर्जेदार द्राक्षांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे.मात्र गेल्या काही वर्षांत अनियमित पाऊस, बदलते हवामान, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि बाजारातील चढ-उतार यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. हवामानातील बदलांमुळे कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा खर्च झपाट्याने वाढला असून उत्पादनखर्च आणि उत्पन्न यातील तफावत वाढत चालली आहे. यावर उत्तर देताना राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सकारात्मक भूमिका घेतली. सांगलीतील द्राक्ष संशोधन केंद्राचे काम थांबले असेल, तर त्यामागील कारणांची सविस्तर माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.

द्राक्ष संशोधन केंद्र का महत्त्वाचे?

  • सांगली जिल्हा राज्यातील प्रमुख द्राक्ष निर्यात पट्टा
  • तासगावची बेदाणा उत्पादनासाठी राज्यभर ओळख
  • हवामान बदल, कीड-रोग आणि वाढता उत्पादनखर्च
  • स्थानिक पातळीवर तांत्रिक मार्गदर्शनाची गरज
  • दर्जावाढ व निर्यात निकष पूर्ण करण्यासाठी सक्षम संशोधन केंद्र आवश्यक
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Grape Research Center Stalled? Question Raised in Assembly.

Web Summary : MLA Vishwajit Kadam questioned the stalled Sangli Grape Research Center project. Facing climate change and rising costs, grape farmers need technical guidance. The minister assured action.