अजबच! मृत्यूचा शोक करीत असताना आजी जिवंत, अन्..; सांगली जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 04:47 PM2023-09-11T16:47:41+5:302023-09-11T16:52:07+5:30

श्वास थांबल्यानंतरही पुन्हा त्यांच्या शरीरात झालेल्या हालचाली या घटनांनी आश्चर्य व्यक्त होत आहे

When the relatives were mourning the death, the relatives came to know that the grandmother was alive, A strange incident in Sangli district | अजबच! मृत्यूचा शोक करीत असताना आजी जिवंत, अन्..; सांगली जिल्ह्यातील घटना

अजबच! मृत्यूचा शोक करीत असताना आजी जिवंत, अन्..; सांगली जिल्ह्यातील घटना

googlenewsNext

ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील श्रीमती गंगुबाई नाना देसाई (वय ११०) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. तीन दिवसांपूर्वी गंगुबाईंच्या मृत्यूचा शोक नातेवाईक करीत असतानाच त्या जिवंत असल्याचे नातेवाइकांना कळाले. तीन दिवसांनंतर पुन्हा त्यांचे निधन झाले.

गंगुबाई यांचा तीन दिवसांपूर्वी श्वसन थांबल्यानंतर मृत्यू झाल्याचे ओळखून सर्व कुटुंबीय, नातेवाईक शोकसागरात बुडाले होते. त्याचवेळी त्यांच्यात हालचाली जाणवल्या. त्यामुळे कुटुंबीयांना सुखद धक्का बसला. तीन दिवस त्या सर्वांसोबत राहिल्या आणि शनिवारी रात्री गंगुबाई यांचे निधन झाले. 

दीर्घ आयुष्य जगल्याने व श्वास थांबल्यानंतरही पुन्हा त्यांच्या शरीरात झालेल्या हालचाली या घटनांनी आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्व देसाई वस्तीवरील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक नाना देसाई यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Web Title: When the relatives were mourning the death, the relatives came to know that the grandmother was alive, A strange incident in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली