शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील जेव्हा राहुल महाडिकांशी गप्पा मारतात.., सांगलीत चर्चेचा विषय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 15:29 IST

इस्लामपूर मतदारसंघ अधिक मजबूत करण्याचा जयंत पाटील यांचा प्रयत्न

अशोक पाटीलइस्लामपूर : वाळवा-शिराळा तालुक्यांत ग्रामपंचायत निवडणुका राष्ट्रवादीच्या गटांमध्येच रंगल्या. काही ठिकाणी भाजपसह इतर पक्षांची ताकद दिसली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांचा अद्याप अंदाज नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक हे आमदार असले तरी सत्तेत नाहीत. त्यामुळे सर्वच नेते राजकारण विसरून नैमित्तिक कार्यक्रमात भेटीगाठी घेत दिलखुलास गप्पा मारताना दिसत आहेत.इस्लामपुरातील एका विवाह सोहळ्यात शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती दिसली. जयंत पाटील यांची उपस्थिती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पाटील यांच्याकडे सध्या मंत्रिपद नाही. त्यामुळेच तेही अशा कार्यक्रमांत थांबताना दिसू लागले आहेत. अशा कार्यक्रमात विरोधकांना जवळ घेऊन गप्पांचा फड जमवण्यात त्यांचा हातखंडा आहे. शुक्रवारी या लग्नातही त्यांनी भाजपचे नेते राहुल महाडिक भेटताच दिलखुलास गप्पा मारल्या.इस्लामपूर, शिराळा विधानसभा मतदारसंघात दिवंगत नेते नानासाहेब महाडिक यांच्यानंतर राहुल आणि सम्राट महाडिक या बंधूंनी राष्ट्रवादी हाच विरोधक मानून भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. परंतु इस्लामपुरात निशिकांत पाटील आणि शिराळ्यात सत्यजित देशमुख हेही भाजपमधील आपल्या गटाची ताकद दाखवत आहेत. इस्लामपूर मतदारसंघ अधिक मजबूत करण्याचा जयंत पाटील यांचा प्रयत्न सुरू आहे. मतदारसंघात येणाऱ्या मिरज तालुक्यातील डिग्रज मंडलमधील सर्व गावांत आणि वाळवा तालुक्यातील गावांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या गावांमध्ये राहुल महाडिक, निशिकांत पाटील, संभाजी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार व हुतात्मा गटाने शिरकाव केला आहे. मागील काही विधानसभा निवडणुकांत जयंत पाटील यांच्या विरोधात दिवंगत अशोकदादा पाटील, वैभव नायकवडी, निशिकांत पाटील, गौरव नायकवडी यांची ताकद दिसली आहे. मात्र महाडिक बंधू त्यांच्या विरोधात थेट मैदानात उतरलेले नाहीत. त्यामुळे राहुल महाडिक यांची भेट आणि गप्पा चर्चेचा विषय ठरल्या.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJayant Patilजयंत पाटील