शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहाच्या नामांतरावर मतभेद का?

By admin | Updated: September 22, 2015 23:50 IST

वाळवा पंचायत समिती : राष्ट्रवादीचा काँग्रेससह विरोधकांना सवाल

अशोक पाटील -इस्लामपूर -वाळवा पंचायत समितीच्या आवारातील जुनी इमारत जमीनदोस्त होणार आहे. त्याच इमारतीमधील वसंतदादा यांचे नाव असलेले सभागृहही पाडले जाणार आहे, तर नवीन इमारतीमधील सभागृहाला राजारामबापू यांचे नाव देण्याचे सत्ताधारी राष्ट्रवादीने निश्चित केले आहे. याला काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. वसंतदादांचा आदर करणारे नेते आजही काँग्रेससह राष्ट्रवादीमध्ये आहेत. परंतु दादांच्याच वारसदारांनी त्यांनी स्थापन केलेल्या संस्था मोडीत काढल्या आहेत. याचे ज्वलंत उदाहरण असताना, वाळवेकरांना वसंतदादांच्या नावाचा अट्टाहास का, असा प्रतिसवाल राष्ट्रवादीने काँग्रेसला विचारला आहे.पंचायत समितीच्या नवीन सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्यासाठी राष्ट्रवादीचे सभापती रवींद्र बर्डे आणि त्यांचे सदस्य ठाम आहेत; तर काँग्रेसचे सदस्य प्रकाश पाटील यांनी पूर्वीचेच वसंतदादांचे नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे. याला जिल्हा परिषदेच्या तीन माजी सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दादा-बापू समर्थकांतील वाद पेटला आहे. यावर विरोधी पक्ष आणि इतर मोठे नेते भाष्य करत नाहीत.राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत आपले नाव न छापण्याच्या अटीवर काँग्रेसच्या नेत्यांना प्रतिसवाल केले आहेत. वसंतदादांचे कार्य मोठे आहे. त्यांनी आशिया खंडात सर्वात मोठा साखर कारखाना उभा केला. तो त्यांच्या वारसदारांनी मोडीत काढला आहे. त्यांच्याच नावाची असलेली सहकारी बँक बुडाली आहे. राज्यात त्यांच्या नावे असलेल्या सहकारी संस्थांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची बदनामीच होत चालली आहे. याउलट वाळवा तालुक्यात राजारामबापू पाटील यांनी सुरू केलेल्या संस्थांचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आर्थिक संस्थांनीही घोडदौड करत राज्यभर विस्तार केला आहे. शिक्षण संस्थांचे नावही राज्यभर गाजले आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातील पंचायत समिती सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्यात काहीच गैर नसल्याचेही सांगण्यात आले.वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्था राज्यात अग्रेसर आहेत. या सर्वच संस्थांमधून हजारो हातांना काम मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळावा म्हणून सर्व सहकारी संस्था उभ्या करण्यात बापूंचे योगदान आहे. तालुक्यातील इंचन इंच जमीन ओलिताखाली येण्यासाठी त्यांनी पाणी परवाने काढले नसते, तर आजचे वाळवा तालुक्याचे चित्र वेगळे असते. त्यामुळे वाळवा तालुक्यातील सर्वच संस्थांना त्यांचे नाव दिले तर यात गैर ते काय?- विनायकराव पाटील, अध्यक्ष राजारामबापू दूध संघ.विलासराव शिंदे यांचे मौनवाळवा पंचायत समिती सभागृहाच्या नावाचा वाद तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. १९८० मध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांनी जनता पक्षातून वाळवा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, तर वसंतदादांच्या ताकदीवर विलासराव शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बापूंचा पराभव केला होता. तेच विलासराव शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी या नामांतराबाबत मौन पाळणे पसंद केले आहे.