शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा पश्चिम भाग दुसऱ्या दिवशीही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरूड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरूड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रमुख बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. कोकरूड पोलीस स्टेशनने महत्त्वाच्या गावात बंदोबस्त ठेवला आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात रुग्णसंख्या कमी असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन आणि कोकरूड पोलिसांनी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत शनिवार, रविवारी नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले. कोकरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ स्वतः सहकाऱ्यांच्या बरोबरीने काम करत असून त्यांनी कोकरूड, शेडगेवाडी, चरण, आरळा, बिळाशी या महत्त्वाच्या गावांमध्ये बंदोबस्त ठेवला आहे.

विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. कोकरूड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या सर्व गावांत लॉकडाऊनला व्यापारी, ग्रामस्थ, व्यावसायिकांना शंभर टक्के सहकार्य मिळत आहे. रुग्णालये, औषध दुकाने, कृषी दुकाने, मांस विक्री दुकाने, दूध वितरण व्यवस्था या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोशल डिस्टन्सिंग ठेवत सुरू आहेत.