शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पश्चिम बंगालचा चोरटा पुण्यातून जेरबंद, पोलिसांची सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 10:47 IST

Crimenews, Police, railway, Sangli साडेचार लाखांचे सोने घेऊन पसार झालेल्या पश्चिम बंगाल येथील गलाई कारागिराला मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

ठळक मुद्देपश्चिम बंगालचा चोरटा पुण्यातून जेरबंदपोलिसांची सतर्कता : साडेचार लाखांचे सोने घेऊन पसार

सांगली : साडेचार लाखांचे सोने घेऊन पसार झालेल्या पश्चिम बंगाल येथील गलाई कारागिराला मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका रात्रीत गुन्ह्याचा छडा लागला. तरुण दयाल मोदी (वय २०, रा. शीतलपूर, पश्चिम मिदनापूर, ता. घाटाल, पश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत अनिल जाना (‌वय ३६, रा. गावभाग, खिलारे वाडा, सांगली, मूळ रा. किस्मत, ता. घाटाल) यांनी फिर्याद दिली होती.याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत जाना यांचे सांगलीत सराफी दुकान आहे. या दुकानात तरुण मोदी हा कारागीर म्हणून वर्षभरापासून काम करत होता. जाना यांनी त्याच्याकडे १०२ ग्रॅम सोने दिले होते. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हे सोने घेऊन तरुण मोदी हा पसार झाला. त्याचा दूरध्वनीही बंद होता.

जाना यांनी तातडीने शहर पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक नीलेश बागाव, दिलीप जाधव, संदीप पाटील, विक्रम खोत, अक्षय कांबळे यांना संशयिताचा शोध घेण्याचे आदेश दिले.पोलीस पथकाने त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन शोधले असता, ते सांगली रेल्वे स्थानकावर दाखवत होते. पथकाने सांगली रेल्वे स्थानकावर धाव घेतली. रात्री अकरा वाजण्याच्यासुमारास गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस सुटल्याची माहिती मिळाली.

याच रेल्वेने संशयिताने पलायन केले असावे, असा अंदाज घेत पथकाने पुणे, अहमदनगर, दौंड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून चोरट्याची माहिती दिली. पहाटे साडेचारच्यासुमारास रेल्वे पुणे स्थानकावर आल्यानंतर आरसीएफचे निरीक्षक अश्वनीकुमार, फौजदार रेड्डी, कवडे यांनी चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. सकाळी नऊ वाजता सांगली पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच तासांत चोरटा जेरबंद झाला.दिल्लीला जाणार होता चोरटासोने चोरीतील संशयिताला पुणे रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. तो रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूममध्ये बसला होता. त्याच्याकडे दिल्लीचे तिकीट मिळून आले. यापूर्वी त्याने आणखी कुठे गुन्हा केला आहे का? याचा शोध पोलीस घेत असल्याचे निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसrailwayरेल्वेSangliसांगली