नवाब मालिकांना अडचणीत आणायचे नाही, प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे; जयंत पाटील यांचं विधान
By अविनाश कोळी | Updated: August 16, 2023 22:22 IST2023-08-16T22:20:41+5:302023-08-16T22:22:00+5:30
नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळाला आहे. मात्र, मलिक हे तुरुंगात असताना राष्ट्रवादीचे दोन गट झाले.

नवाब मालिकांना अडचणीत आणायचे नाही, प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे; जयंत पाटील यांचं विधान
मिरज : नवाब मलिक यांचा जामीन झाल्यानंतर अजित पवार गटाचे काही नेते मलिक यांना भेटल्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक यांना राजकारणात अडचणीत आणायचे नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सध्या तरी कोणत्याही स्वरूपाची तसदी देणार नाही. त्यांची सुटका झाल्याचे आम्हाला समाधान आहे. त्यांच्या प्रकृतीला आधी प्राधान्य व त्यानंतर राजकारणाचे पाहू, असे ते म्हणाले.
नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळाला आहे. मात्र, मलिक हे तुरुंगात असताना राष्ट्रवादीचे दोन गट झाले. जामीन मिळाल्यानंतर ते शरद पवार की अजित पवार गटात जाणार याची उत्सुकता आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. विश्रांती घेणाऱ्या मलिक यांना आम्हाला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणायचे नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सध्या तरी तसदी देणार नाही. त्यांची सुटका झाली याचे आम्हाला समाधान आहे, असे जयंत पाटील सांगितले. सुप्रिया सुळे यांनीही नवाब मलिक यांची भेट घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.