शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

टेंभू सुधारित योजनेमुळे ४१ हजार ००३ हेक्टर क्षेत्राला पाणी; सांगलीसह सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांना फायदा

By अशोक डोंबाळे | Updated: December 16, 2023 16:40 IST

अशोक डोंबाळे सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सात हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाने हिवाळी अधिवेशनावेळी ...

अशोक डोंबाळेसांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सात हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाने हिवाळी अधिवेशनावेळी गुरुवारी मान्यता दिली. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांमधील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे. तसेच, टेंभूला पूर्वी २२ टीएमसी पाणी मिळत होते. त्यामध्ये नव्या मान्यतेने ८ टीएमसी पाण्याची भर पडणार आहे.टेंभू योजनेमध्ये सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांतील २४० गावांमधील ८० हजार ४७२ हेक्टर शेतीला पाणी देण्याचे नियोजन होते. त्यानुसार मुख्य कालव्यासह वितरण व्यवस्थेची कामे झाली आहेत. या कामावर आजअखेर तीन हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच चार हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित खर्चास शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली होती. या योजनेच्या लाभापासून सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुका वंचित राहिले होते. तसेच योजनेत सहभागी तालुक्यांतीलही काही गावे वंचित राहिली होती.

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर व सुमनताई पाटील यांनी शासनाकडे रेटा लावला. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील १०९ वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील १८, खटाव तालुक्यातील २८, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील १५, तासगाव १३, आटपाडी १३, कवठेमहांकाळ ८, जत ४ आणि सांगोला तालुक्यातील १० गावांचा नव्याने समावेश झाला आहे. त्यामुळे या आठ तालुक्यांतील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने अतिरिक्त ८ टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.नव्याने सिंचनाखाली येणारे क्षेत्रतालुका  - गावे  - सिंचन क्षेत्र (हेक्टर) - पाणी वापरमाण -  १८ - ५६-  ८६ - १ टीएमसीखटाव - २८ - ७४- ४० - १.५ टीएमसीखानापूर - १५ - ६४- ७१ - १.५ टीएमसीतासगाव - १३ - ६० - २६ - १ टीएमसीआटपाडी - १३ - ५२ - ९४ - १ टीएमसीकवठेमहांकाळ - ८ - ४२- ५५ - ०.५ टीएमसीजत   - ४ - २६ - ३६ - ०.५ टीएमसीसांगोला - १० - ३१ - ९५ - १ टीएमसीएकूण  -  १०९ - ४१००३  - ८ टीएमसी

जिल्ह्यातील या गावांचा नव्याने समावेशखानापूर तालुका : भिकवडी (बु.), करंजे, रेणावी, रेवणगांव, भडकेवाडी, घाेटी (बु.), घोटी (खु.), धोंडगेवाडी, ऐनवाडी, जखीनवाडी, जाधववाडी, घाडगेवाडी, बानुरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी,तासगाव तालुका : वायफळे, बिरणवाडी, यमगरवाडी, दहिवडी, कचरेवाडी, किंदरवाडी, नरसेवाडी, धोंडेवाडी, विजयनगर, सावळज, डोंगरसोनी, वडगाव, लोकरेवाडीकवठेमहांकाळ : गर्जेवाडी, कुंडलापूर, रायवाडी, केरेवाडी, शेळकेवाडी, जाखापूर, जायगव्हाण, लोणारवाडी, आटपाडी : आंबेवाडी, बोंबेवाडी, राजेवाडी, काळेवाडी, खाजोडवाडी, लिंगीवरे, उंबरगाव, पांढरेवाडी, पिंपरी (खु.), पुजारवाडी (दिघंची), विभूतवाडी, गुळेवाडी, पडळकरवाडी जत : बेवनूर, नवाळवाडी, वाळेखिंडी, सिंगणहळ्ळी.

टेंभू योजनेच्या सात हजार ३७०.३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे टेंभू योजनेत सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांतील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहेत. निधीला मंजुरी मिळाल्यामुळे तत्काळ कामे सुरू करून वंचित गावांमधील शेतीला पाणी देण्यात येणार आहे. -चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीSatara areaसातारा परिसरSolapurसोलापूर