शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील काळी खणीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे, नागरिकांच्या तक्रारीची घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:59 IST

प्रदूषण मंडळाची कार्यवाही 

सांगली : महापालिकेच्या काळी खण परिसरातील सुशोभीकरण प्रकल्पाबाबत करण्यात आलेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत प्रदूषण नियंत्रण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून मलमिश्रित पाण्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.काळी खण प्रकल्पाचा मूळ उद्देश प्रदूषित पाण्याचे शुद्धीकरण करून ते नागरिकांच्या वापरायोग्य स्वरूपात आणणे हा होता. मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प पर्यावरण संरक्षणाऐवजी केवळ सौंदर्यीकरणापुरताच मर्यादित ठेवण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून अनेक कामे नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तक्रारीनुसार, प्रस्तावित १८ मीटर रुंदीचा रस्ता १२ मीटरपर्यंत अरुंद करण्यात आला. रस्त्याचे रुंदीकरण करण्याऐवजी अरुंदीकरण करण्यात आले असून, नियमबाह्य पद्धतीने पादचारी मार्ग वाढविण्यात आले आहेत. सार्वजनिक सुरक्षितता व आवश्यक अंतराचे निकष डावलण्यात आल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे.या पार्श्वभूमीवर प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रेमनगर परिसरासह काळी खण येथे भेट देऊन ज्या ठिकाणाहून मलमिश्रित पाणी खणीत मिसळत आहे, त्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी पाण्याचे नमुने घेण्यात आले. पाहणीदरम्यान महापालिकेचे उद्यान अधीक्षक, स्वच्छता निरीक्षक, बांधकाम विभागाचे अधिकारी राजपूत, तक्रारदार शंभूराज काटकर, तानाजीराव रुईकर, पर्यावरण विभागाचे कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाची पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे. आवश्यक ती कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन तसेच कायदेशीर लढा देण्याचा इशारा तक्रारदार व आंदोलकांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli's Black Quarry Water Samples Sent for Testing After Complaints

Web Summary : Following complaints, Sangli's polluted Black Quarry water samples were taken for lab testing. Concerns include alleged irregularities in beautification projects, narrowed roads, and compromised safety standards. Further action depends on the lab report; protests are threatened.