शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १३१ शिक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 27, 2015 23:18 IST

लोंढे प्रकरणातील नियुक्ती वाद : मे २०१५ पासून वेतन रोखले, आर्थिक संकट

शरद जाधव - भिलवडी तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. सी. लोंढे यांनी दिलेल्या मान्यताप्रकरणी वेतन थांबवून चौकशीच्या फेऱ्यात अडकविलेल्या १९० पैकी १३१ शिक्षकांचे वेतन अद्याप सुरू झाले नसून, हे सर्व शिक्षक सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या शिक्षकांचे मे २०१५ पासून वेतन रोखल्याने त्यांना आर्थिक संकटातून जावे लागत आहे. शिवाय सध्या हे सर्व शिक्षक मानसिक तणावात काम करीत आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने आपले वेतन त्वरित सुरू करावे, अशी मागणी पीडित शिक्षकांनी केली आहे.माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या मान्यतापैकी १९० शिक्षकांची गेल्या चार महिन्यांपासून चौकशी सुरू आहे. वास्तविक या मान्यताप्रश्नी शिक्षकांचा कोणताही दोष नसताना माध्यमिक शिक्षण विभागाने त्यांचे वेतन मे २०१५ पासून बेकायदेशीररित्या रोखले आहे. याप्रकरणी डी. सी. लोंढे यांना निलंबित केले आहे, तर या मान्यताप्रकरणी लोंढे यांच्या कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांचे वेतन मात्र सुरू आहे. या मान्यताप्रकरणी या शिक्षकांचा कोणताही दोष नसताना संस्थांनी दिलेल्या नेमणुकीनुसार या शिक्षकांचे प्रस्ताव मुख्याध्यापकांकरवी माध्यमिक शिक्षण विभागाकडे आल्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना मान्यता दिल्या आहेत. डी. सी. लोंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात ४५० शिक्षक-शिक्षकेतरांना मान्यता दिल्याचे उजेडात आले आहे. मात्र यातील १९० जणांनाच चौकशी समितीने दोषी का धरले आहे? हे कोडे अनाकलनीय आहे.गेल्या चार महिन्यांपासून चौकशी चालू असतानाच गेल्या आठवड्यात १९० पैकी ५९ जणांना दोषमुक्त करून माध्यमिक शिक्षण विभागाने त्यांचे वेतन सुरू केले आहे. मात्र उर्वरित १३१ जणांना अजूनही ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. पगार रोखल्याने हे शिक्षक गेल्या चार महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी काढलेली बॅँकांची कर्जे थकली आहेत. शिक्षक परिषदेची साथलोंढेप्रकरणी पीडित शिक्षकांसाठी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांच्या शिक्षक परिषदेने बैठका, आंदोलने करून या शिक्षकांसाठी परिश्रम घेतले आहेत. मात्र सध्याचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची कृती समिती याप्रकरणी अपेक्षित पावले उचलू शकलेली नाही, असे पीडित शिक्षकांतून बोलले जात आहे.