Local Body Election Voting: सांगली जिल्ह्यात मतदानासाठी मतदारांची गर्दी, साडेअकरा वाजेपर्यंत २४.७७ टक्के मतदान
By अशोक डोंबाळे | Updated: December 2, 2025 12:44 IST2025-12-02T12:42:11+5:302025-12-02T12:44:17+5:30
आष्टा नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक तीन मधील एका मतदान केंद्रावरील वोटिंग मशीन नादुरुस्त असल्याने नऊ पर्यंत मतदान ठप्प होते

Local Body Election Voting: सांगली जिल्ह्यात मतदानासाठी मतदारांची गर्दी, साडेअकरा वाजेपर्यंत २४.७७ टक्के मतदान
सांगली: जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २४.७७ टक्के मतदान झाले आहे. शिराळा, विटा, उरुण-ईश्वरपूर, तासगाव यांसारख्या ठिकाणी मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगां लावलेल्या आहेत. उर्वरित ठिकाणीही मतदानाचा वेग वाढत आहे.
जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत या सहा नगरपरिषद आणि शिराळा, आटपाडी या दोन नगरपंचायतीसाठी मोठ्या चुरशीने मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ९.३० वाजता ९.४८ टक्के मतदान झाले होते. दहाच्या वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढत असल्याने मतदानाचा टक्का वाढू लागला आहे.
सकाळी ११.३० वाजता आठ पालिका क्षेत्रातील दोन लाख ५७ हजार ९७७ मतदारांपैकी ६३ हजार ९१३ मतदारांनी मतदान केले आहे. यापैकी पुरुष ३४ हजार २६३ आणि महिला २९ हजार ६४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सरासरी २४.७७ टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान आष्टा नगरपरिषद प्रभाग क्रमांक तीन मधील एका मतदान केंद्रावरील वोटिंग मशीन नादुरुस्त असल्याने नऊ पर्यंत मतदान ठप्प होते. नऊ नंतर मतदान सुरळीत सुरू झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री शहरातील काही चौकामध्ये लिंबू व भंडारा टाकण्याचा प्रकार घडला असून याची शहरात चर्चा सुरू होती.
११.३० वाजेपर्यंत आठ पालिकांतील मतदान टक्केवारी
पालिका / मतदानाची टक्केवारी
- उरुण-ईश्वरपूर / २४.५०
- विटा / २२.४९
- आष्टा / २६.६६
- तासगाव / २४.९०
- जत / २२.२५
- पलूस / २५.२३
- शिराळा / २९.५८
- आटपाडी / २७.७०