सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन

By संतोष भिसे | Updated: December 15, 2023 14:42 IST2023-12-15T14:41:39+5:302023-12-15T14:42:53+5:30

१५ नोव्हेंबर रोजी मिरजेत मॉर्निंग वॉकला गेले असता, अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती.

Vivek Kamble, former mayor of Sangli, Miraj, Kupwad Municipal Corporation passed away | सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष विवेक कांबळे यांचे शुक्रवारी (दि. १५) सकाळी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

१५ नोव्हेंबर रोजी मिरजेत मॉर्निंग वॉकला गेले असता, अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मारा लागला होता. त्यांच्या पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचे देहावसान झाले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सक्रिय कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. तत्कालीन मिरज नगरपालिकेत व सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले होते. अत्यंत आक्रमक नेता अशी त्यांची ओळख होती. मिरज शहराच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व होते.

Web Title: Vivek Kamble, former mayor of Sangli, Miraj, Kupwad Municipal Corporation passed away

टॅग्स :Sangliसांगली