विटा : कापड उत्पादकाला १४ लाखांचा गंडा विट्यात गुन्हा दाखल : पाच जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:03 IST2018-09-28T00:00:33+5:302018-09-28T00:03:30+5:30

खानापूर तालुक्यातील कार्वे-विटा येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या साहील टेक्स्टाईल्स या कापड उत्पादक कारखान्यातील कापड खरेदी करून कापडाचे सुमारे १४ लाख ३ हजार रूपये उत्पादकाला न देता

 Vita: 14 lakhs of clothes worth Rs 14 lakhs of clothes have been filed | विटा : कापड उत्पादकाला १४ लाखांचा गंडा विट्यात गुन्हा दाखल : पाच जणांचा समावेश

विटा : कापड उत्पादकाला १४ लाखांचा गंडा विट्यात गुन्हा दाखल : पाच जणांचा समावेश

ठळक मुद्देविट्यात गुन्हा दाखल : पाच जणांचा समावेशवस्त्रोद्योग क्षेत्रात खळबळ

विटा : खानापूर तालुक्यातील कार्वे-विटा येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या साहील टेक्स्टाईल्स या कापड उत्पादक कारखान्यातील कापड खरेदी करून कापडाचे सुमारे १४ लाख ३ हजार रूपये उत्पादकाला न देता त्याची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी कापड उत्पादक प्रकाश रामराव मराठे (रा. तासगाव) यांनी गुरूवारी विटा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेशकुमार गोपालदास धानुका-बन्सल (रा. कळंबादेवी रोड, मुंबई), सदाशिवी त्रिपाठी (रा. मेट्रो रेल्वे स्टेशनसमोर, घाटकोपर), तानाजी पाटील, विलास गावकर (रा. मुंबई) व एजंट सुरेश भिंगारदेवे (रा. विटा) अशी या प्रकरणातील संशयितांची नावे आहेत.
तासगाव येथील प्रकाश मराठे यांची कार्वे-विटा औद्योगिक वसाहतीत साहील टेक्स्टाईल ही फर्म आहे.

२००८ पासून ते हा व्यवसाय करतात. मराठे यांच्या कारखान्यात मुंबईचे चार व्यापारी व सुरेश भिंंगारदेवे आले. त्यावेळी त्यांनी कापड खरेदी करतो, पैशाची अडचण नाही, त्याला आम्ही जबाबदार आहे, असे मराठे यांना सांगितले. त्यावेळी संशयितांनी ८ डिसेंबर २०१६ ते १५ मे २०१७ अखेर मराठे यांच्याकडून २३ लाख ८९ हजार ९८० रूपयांचे कापड खरेदी करून, त्याच्या बिलापोटी २६ डिसेंबर २०१६ पासून १३ एप्रिल २०१७ अखेर मराठे यांच्या बॅँक खात्यात एकूण ९ लाख ८६ हजार ४१८ रूपये जमा केले.

मात्र, उर्वरित १४ लाख ३ हजार ५६२ रूपये मराठे यांनी त्या व्यापाऱ्यांना वेळोवेळी मागणी करूनही दिली नाही. त्यामुळे मराठे यांनी गुरूवारी विटा पोलिसांत मुंबई येथील राकेशकुमार धानुका, सदाशिवी त्रिपाठी, विलास गावकर, तानाजी पाटील व विटा येथील सुरेश भिंगारदेवे यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

मुंबईतील चौघांचा समावेश
मराठे यांनी गुरूवारी विटा पोलिसांत मुंबई येथील राकेशकुमार धानुका, सदाशिवी त्रिपाठी, विलास गावकर, तानाजी पाटील व विटा येथील सुरेश भिंगारदेवे यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Web Title:  Vita: 14 lakhs of clothes worth Rs 14 lakhs of clothes have been filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.