शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास नांगरे-पाटील बोलतोय; तक्रारींची दाखवली भीती, सांगलीतील महिला डॉक्टरला घातला साडेपंधरा लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 12:59 IST

सांगली : बेकायदेशीर संदेश, मनी लाँड्रिंग व गॅम्बलिंगच्या तक्रारी आल्याची भीती घालून सांगलीतील महिला डॉ. शीतल संजय पाटील (वय ...

सांगली : बेकायदेशीर संदेश, मनी लाँड्रिंग व गॅम्बलिंगच्या तक्रारी आल्याची भीती घालून सांगलीतील महिला डॉ. शीतल संजय पाटील (वय ५७, रा. मारुती चौक, गावभाग, सांगली) यांच्याकडून तब्बल १५ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुरेशकुमार दास, हेमराज कोळी आणि विश्वास नांगरे-पाटील नावाने बोलणारी व्यक्ती, अशा तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.संशयित सुरेशकुमार दास नामक व्यक्तीने डॉ. शीतल पाटील यांच्याशी दहा दिवसांपूर्वी मोबाइलवरून संपर्क साधला. डॉ. पाटील यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग, गॅम्बलिंग आणि बेकायदेशीर मेसेजच्या सतराहून अधिक तक्रारी आल्या असून, मुंबई येथील टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक हेमराज कोळी हे तपास करीत असल्याची खोटी माहिती दिली.याप्रकरणात तुमचा संबंध नसल्याचे सिद्ध करायचे असेल तर बँक खात्यावरून पैसे पाठवावे लागतील. आरबीआयच्या नियमानुसार आम्ही माहिती घेत आहोत, असे सांगून संशयित हेमराज कोळी याने डॉ. पाटील यांच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला. त्यांना पोलिस असल्याचे ओळखपत्र, न्यायालयाचे अटक वॉरंट, ईडीची आणि आरबीआयची बनावट नोटीस, अशी कागदपत्रे पाठवून दिली. तसेच अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी विश्वास नांगरे-पाटील बोलत आहेत, असे भासवून एका भामट्याने डॉ. पाटील यांच्याशी संभाषण केले. यामुळे घाबरलेल्या डॉ. पाटील यांनी ५ लाख रुपये स्वत: त्या खात्यातून आरोपीच्या बंधन बँकेतील खात्यावर पाठविले. तसेच दि. १२ रोजी बँकेतून सोने तारण ठेवून कर्ज काढलेले १० लाख ५० हजार रुपये हेमराज कोळी यांनी सांगितलेल्या सारस्वत बँकेच्या खात्यात जमा केले. हा प्रकार दि. ७ ते १६ ऑगस्ट या कालावधीत हा घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. पाटील यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसdoctorडॉक्टर