शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

विशाल पाटील अडकले लोकसभेच्या चक्रव्यूहात, विश्वजित कदम बंडखोरीचे सारथ्य करणार?

By हणमंत पाटील | Published: April 12, 2024 11:53 AM

हायकमांडच्या आदेशानंतर काय ?

हणमंत पाटीलसांगली : सांगली लोकसभेच्या रणांगणात एकाकी पडलेल्या विशाल पाटील यांंच्या बंडखोरीचे सारथ्य काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम शेवटपर्यंत करणार का, वंचित, ओबीसी व स्वाभिमानीचा पाठिंबा मिळणार का, आघाडी धर्म पाळण्यासाठी ऐनवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी साथ सोडली, तर कार्यकर्ते पाठीशी राहणार का, पक्षाचा ए-बी फार्म न मिळाल्यास अपक्ष चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचणार का, अशा विविध राजकीय प्रश्नांच्या चक्रव्यूहात विशाल पाटील अडकले आहेत.माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. गतपंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर साधारण साडेतीन लाख मते त्यांनी मिळविली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून आपण सहज मैदान मारू या भ्रमात ते होते. मात्र, महाविकास आघाडीतील जागावाटपामध्ये सांगलीची जागा दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ऐनवेळी उद्धवसेनेत प्रवेश करून मिळविली. त्यानंतर विशाल पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे नेते व पदाधिकारी खडबडून जागे झाले.

डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ते मुंबई व दिल्लीतील हायकमांडला भेटले. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने या जागेवरील दावा सोडू नये म्हणून आक्रमक भूमिका घेतली. मात्र, या काळात मविआच्या पुलाखालून बरेच पाणी गेले. त्यामुळे सांगलीच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, या भूमिकेवर येऊन काँग्रेसने एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे विशाल पाटील लोकसभेच्या रणांगणात एकाकी पडले.

हायकमांडच्या आदेशानंतर काय ?मविआची सांगलीची जागा उद्धवसेनेला जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांनी पलूस येथे एकत्रित पत्रकार परिषद बुधवारी घेतली. मविआने सांगलीच्या जागेचा गांभीर्याने विचार करून फेरनिर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी दोन दिवसांची मुदतही दिली आहे. अन्यथा बंडखोरीचा अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला आहे. याचवेळी सांगली जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी महिन्यापूर्वी पक्ष विसर्जित करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी तसा निर्णय घेऊन विशाल पाटील यांच्या बंडखोरीला साथ देणार का, ऐनवेळी हायकमांडचे आदेश आल्यानंतर याच नेत्यांनी माघार घेतल्यास कार्यकर्ते बंडखोरी सोबत राहणार का ? या चक्रव्यूहात विशाल पाटील सापडले आहेत.

वंचित, स्वाभिमानी व ओबीसी पक्षाची साथ मिळेल का ?सांगली लोकसभेत वंचित व स्वाभिमानी संघटनेने उमेदवार उभे केलेले नाहीत. दोन्ही पक्षाचे नेते मविआविषयी नाराज आहेत. ते विशाल पाटील यांना पाठिंबा देतील का? ओबीसी पक्षाचे नेते व माजी आमदार प्रकाश शेडगे यांची भेट घेऊन त्यांनाही पाठिंब्यासाठी साकडे घातले आहे. या सर्वांची साथ घेऊन लोकसभेच्या चक्रव्यूहातून मार्ग काढण्याचे आव्हान विशाल पाटील यांच्यासमोर आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४vishal patilविशाल पाटीलVishwajeet Kadamविश्वजीत कदम