शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी जिल्हा परिषद, महापालिकेसाठी ठोकला शड्डू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 17:59 IST

आजी-माजी पदाधिकाऱ्यांची सांगलीत बैठक : जयश्रीताईंच्या प्रवेशानंतर काँग्रेसला आली जाग

सांगली : आगामी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांसह ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी रात्री बैठक घेतली आहे. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि महापालिका प्रभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचनाही डॉ. कदम यांनी कार्यकर्त्यांनी दिल्या.पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेत्यांना अखेर जाग आली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांसह ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीतील भारती हॉस्पिटलच्या विश्रामगृहात बैठक झाली.या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी महापौर किशोर जामदार, संजय मेंढे, मंगेश चव्हाण, विशाल कलगुटगी, काँग्रेसचे मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानंतर सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची निवडणूकही होणार आहे. मागील काही दिवसांपासून महायुतीकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीचे शांत होते. या कारणांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते.या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. कदम आणि खासदार पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले आहे. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि महापालिका प्रभागनिहाय कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशी सूचनाही डॉ. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

नगरसेवकांशी चर्चामहानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत माजी महापौरांसह नगरसेवकांशी सविस्तर चर्चा केली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे. याबाबत माजी नगरसेवकांना बोलावून स्वतंत्र प्रत्येकाशी बंद खोलीत संवाद साधण्यात आला. महापालिका क्षेत्रातील प्रभागातील स्थिती, निवडणुकीसाठी इच्छुकांबाबतची माहिती घेण्यात आली. तसेच कदम यांनीही माजी नगरसेवकांना निवडणुकीबाबत काही सूचना केल्या.

जिल्हा परिषदेला महाविकास आघाडीजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रित लढविणार आहे, असा विश्वास डॉ. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तुम्ही तयारीला लागा, आपण ताकदीने लढू, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते.

जयंत पाटील यांच्याशी लवकरच चर्चामहाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवल्या जाणार आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे, असेही दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.