विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान सोहळा यावर्षीही रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 05:01 PM2021-10-30T17:01:52+5:302021-10-30T17:03:39+5:30

अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समितीचा विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान सोहळा यावर्षीही होणार नाही.

vishnudas Bhave Gaurav Medal Award Ceremony canceled this year too due to corona | विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान सोहळा यावर्षीही रद्द

विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान सोहळा यावर्षीही रद्द

googlenewsNext

सांगली : अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समितीचा विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान सोहळा यावर्षीही होणार नाही. कोरोनामुळे तो रद्द केल्याची माहिती समितीतर्फे शनिवारी देण्यात आली.

रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबरला येथील भावे नाट्यमंदिरात नटराज पूजन होईल, पण कोरोना साथीमुळे पुरस्कार सोहळा मात्र होणार नाही. २०१९ मध्ये रोहिणी हट्टंगडी यांना भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले होते, त्यानंतर सलग दोन वर्षे पुरस्कार प्रदान समारंभ रद्द झाला आहे. गतवर्षी कोरोना व महापुरामुळे समारंभ होऊ शकला नाही. यावर्षी कोरोनाचे निर्बंध १०० टक्के शिथिल नसल्याने रद्द करावा लागला. समितीचे कार्यवाह विलास गुप्ते यांनी सांगितले की, नाट्यगृहात ५० टक्के उपस्थितीला परवानगी आहे, पण सेलिब्रिटीला पुरस्कार दिला जाणार असल्याने रसिकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन सोहळा रद्द करण्यात आला आहे.
 

 

Web Title: vishnudas Bhave Gaurav Medal Award Ceremony canceled this year too due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली