विक्रम बांदल विट्याचे नवे प्रांताधिकारी, येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार

By श्रीनिवास नागे | Updated: June 13, 2023 13:02 IST2023-06-13T12:52:36+5:302023-06-13T13:02:00+5:30

अत्यंत शिस्तबद्ध प्रशासकीय अधिकारी म्हणून परिचित

Vikram Bandal is the new district officer of Vita | विक्रम बांदल विट्याचे नवे प्रांताधिकारी, येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार

विक्रम बांदल विट्याचे नवे प्रांताधिकारी, येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार

विटा: खानापूर-विटाचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांची धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर डॉ. विक्रम वसंतराव बांदल यांची नियुक्ती करण्यात आली. विट्याचे नवे प्रांताधिकारी म्हणून डॉ. बांदल हे येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार आहेत.

प्रांताधिकारी भोर यांनी मे २०२० मध्ये खानापूर-आटपाडीचा पदभार हाती घेतला होता. त्यांचा तीन वर्षाचा प्रशासकीय कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. गेल्या तीन वर्षातील त्यांची प्रशासकीय कारकीर्द चांगली झाली असली तरी मध्यंतरी त्यांच्यावर काही तक्रारी झाल्या होत्या.

आता विट्याचे नवे प्रांताधिकारी म्हणून डॉ. विक्रम बांदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०१४ च्या बॅचचे उपजिल्हाधिकारी आहेत. पुसेगाव (जि. सातारा) येथील शासकीय विद्यानिकेतन शाळेतील सन २००० च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते जळगाव जिल्ह्यातील पाचोडा उपविभागाचे प्रांताधिकारी म्हणून काम करीत होते. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील हिंगवली (ता. भोर) गावचे रहिवाशी आहेत. त्यांची खानापूर-आटपाडीचे प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून ते अत्यंत शिस्तबद्ध प्रशासकीय अधिकारी म्हणून परिचित आहेत.

Web Title: Vikram Bandal is the new district officer of Vita

टॅग्स :Sangliसांगली