शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विजयभाऊंचा ठिय्या; पालिका अस्वस्थ

By admin | Updated: August 28, 2015 23:03 IST

इस्लामपूर पालिका : नगराध्यक्ष खुर्चीचे धनी, तर उपनगराध्यक्षांकडून खुर्चीचा त्याग

अशोक पाटील- इस्लामपूर पालिकेतील नगराध्यक्षांच्या दालनात पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना बसण्यासाठी सन्मानाने खुर्ची ठेवण्यात आली आहे. शिवाय नगराध्यक्षांच्या दालनाशेजारीच छोटेसे कार्यालय आहे. परंतु या वर्षभरात पाटील यांनी नगराध्यक्ष दालनाबाहेरच्या लोखंडी बाकड्याचा ताबा घेतला आहे. त्यावर बसूनच पाटील पालिकेचा कारभार हाकत असल्याने, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी खुर्चीचे धनी बनले आहेत, तर उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी निवडीदिवशीचा एक दिवस वगळता खुर्चीचा त्यागच केला आहे.इस्लामपूर नगरपालिकेतील राजकारण पाहता, सर्व निर्णय विजयभाऊ पाटील यांच्या विचारानेच घेतले जातात. पाटील शहरातील आणि पालिकेच्या राजकारणातील अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात. पालिकेत तीन गट कार्यरत आहेत. यामध्ये पाटील यांचा मोठा गट आहे. यामुळेच प्रत्येक निवडणुकीत आमदार जयंत पाटील त्यांच्याशी सल्लामसलत करूनच निर्णय घेतात.माजी नगराध्यक्ष अशोकदादा पाटील, वाय. एस. जाधव, अ‍ॅड. सुधीर पिसे, भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, सौ. शारदादेवी पाटील यांनी विजयभाऊंना वगळून स्वत:च्या हिमतीवर निर्णय घेतले. त्यामुळे त्यांना काम करताना अनेक अडथळे आले. उर्वरित सर्वच नगराध्यक्षांनी विजयभाऊंच्या ओंजळीनेच पाणी पिले आहे. आता मात्र कहरच झाला आहे. नगराध्यक्ष सूर्यवंशी यांची निवड होऊन वर्ष झाले. मात्र ते केवळ ‘सह्याजीराव’ बनले आहेत. कार्यालयीन वेळेनुसार हजर राहणे, कार्यालयाची वेळ संपल्यानंतर निघून जाणे, हा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. कारभाराबाबतचे सर्व निर्णय बाहेर ठेवलेल्या बाकड्यावरच होत असल्याने, सर्वसामान्यांना नगराध्यक्षांचा चेहराही पाहायला मिळत नाही, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.उपनगराध्यक्ष संजय कोरे नेमके कोणाच्या गटाचे आहेत, याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. ते एन. ए. गु्रपचे असल्याचे मानले जाते. त्यामुळे विजयभाऊ पाटील यांचे समर्थक त्यांच्या कामात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परिणामी त्यांनी निवडीचा दिवस वगळता खुर्चीचाच त्याग केला आहे. ते त्यांचे काम प्रभागात राहूनच करत आहेत. बाकड्यावरील राजकारणामुळेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे दालन अस्वस्थ झाले आहे, एवढे मात्र नक्की!बाकड्यावरून कारभारविजयभाऊ पाटील ज्या बाकड्यावर बसतात, तेथूनच पालिकेचा कारभार हाकला जातो. परंतु ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील मात्र आवारातील झाडाखाली उभे राहून सर्वसामान्यांची कामे करताना दिसतात. नगराध्यक्षांकडे जाणाऱ्या लोकांना ते आपल्याजवळ थोपवतात, तर पालिकेत येणारे लोक विजयभाऊ पाटील अथवा नगराध्यक्षांकडे न जाता आपल्याकडेच येण्यासाठी बी. ए. पाटील वर्षानुवर्षे पालिका आवारातील झाडाखाली थांबतात.