पशुवैद्यकीय रुग्णालये आता सलग सुरु राहणार,वेळा बदलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:08 PM2021-01-05T16:08:05+5:302021-01-05T16:17:16+5:30

Veterinary hospital Sangli- पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी जनावरांच्या रुग्णालयाच्या वेळा बदलण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला.

Veterinary hospitals will now continue in a row, times have changed | पशुवैद्यकीय रुग्णालये आता सलग सुरु राहणार,वेळा बदलल्या

पशुवैद्यकीय रुग्णालये आता सलग सुरु राहणार,वेळा बदलल्या

Next
ठळक मुद्देपशुवैद्यकीय रुग्णालये आता सलग सुरु राहणार,वेळा बदलल्यापशुपालकांच्या सोयीसाठी पशुसंवर्धन मंत्रालयाचा निर्णय

सांगली : पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी जनावरांच्या रुग्णालयाच्या वेळा बदलण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला.

नव्या निर्णयानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी पशुवैद्यकीय रुग्णालये सकाळी ९ ते दुपारी ४.३० या वेळेत सलग सुरु राहतील. दुपारी एक ते दिड जेवणाची सुट्टी राहील. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत कामकाज सुरु राहील. आकस्मिक प्रसंगी २४ तास सेवा सुरु राहील असेही स्पष्ट केले आहे. तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व रुग्णालयांसह फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांनाही नव्या वेळा लागू राहतील.

यापूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत कामकाज चालायचे. हिवाळ्यात सकाळी ८ ते दुपारी १ आणि त्यानंतर ३ ते सायंकाळी ५ या वेळेत उपचार मिळायचे. मधील वेळेत रुग्णालये बंद असल्याने पशुपालकांची गैरसोय व्हायची. जनावरे घेऊन आलेल्या शेतकर्यांना थांबावे लागायचे.

डॉक्टर व कर्मचारीही दिवसभर अडकून पडायचे. उपचारांव्यतिरिक्त बाहेरील कार्यालयीन कामांना वेळ मिळायचा नाही. आता सलग रुग्णालय सुरु राहिल्याने पशुपालक व डॉक्टरांचीही सोय झाली आहे. कार्यालय व रुग्णालयाची वेळ सुसंगत झाली आहे.

Web Title: Veterinary hospitals will now continue in a row, times have changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.