शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
3
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
4
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
5
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
6
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
7
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
8
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
9
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
10
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
11
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
12
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
13
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
15
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
16
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
17
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
18
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
19
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
20
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं

सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात विषारी ‘पोवळा साप’ आढळला; सर्वात लहान विषारी सापांपैकी एक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:21 IST

सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले

शिराळा (जि.सांगली) : शिराळा तालुक्यातील जैवविविधतेत नव्या प्रजातीची भर पडली आहे. येथील पंचायत समितीजवळील एका घराशेजारी दुर्मीळ स्लेंडर कोरल स्नेक आढळला. मराठीत तो पोवळा या नावाने ओळखला जातो. अतिशय क्वचित दिसणाऱ्या या विषारी सापाची नोंद शिराळ्यात प्रथमच झाली आहे. ‘प्लॅनेट अर्थ फाउंडेशन’चे कार्यकर्ते वैभव नायकवडी यांना हा साप आढळला. नायकवडी यांच्यासह समीर पिरजादे, अमित माने आणि प्रणव महाजन या कार्यकर्त्यांनी या सापाची ओळख पटवली. त्याला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले. ‘पोवळा’ हा भारतातील सर्वात लहान विषारी सापांपैकी एक असून, तो दुर्मीळ आहे. त्याची लांबी साधारणपणे ५० ते ९० सेंमीपर्यंत असते. त्याचे शरीर सडपातळ, तपकिरी रंगाचे, काळ्या डोक्यासह शेपटीजवळ काळ्या रिंग आणि दोन ठिपके असलेले असते. तो साधारणत: जमिनीखालील ओल्या मातीत आणि पानांच्या ढिगाऱ्यात आढळतो. पोटाखालचा भाग तेजस्वी पोवळ्या रंगाचा असल्याने त्याला हे नाव प्राप्त झाले आहे. त्या रंगाला पारंपरिकरीत्या त्याच्या विषारी स्वभावाचे प्रतीक मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Venomous Slender Coral Snake Found in Shirala, Sangli District

Web Summary : A rare and venomous slender coral snake, one of India's smallest, was discovered near Shirala. Identified by Planet Earth Foundation, the snake was safely released into its natural habitat. Known for its distinctive coral-colored underside, it is rarely seen.