शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

गाडी सुरू करताना उडाला भडका, पेट घेतल्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:27 IST

विटा येथील घटना : मोटार सुरू करताना आगीचा भडका 

ठळक मुद्देविटा येथील रघुनाथ ताटे यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. भाजीपाला घेऊन जाण्यासाठी ते मारुती ८०० मोटारीचा (क्र.-एम.एच. ०१-व्ही-२४०९) चा वापर करतात. सोमवारी पहाटे भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तू मोटारीत भरून विक्रीसाठी जात होते.

विटा (सांगली) : मोटारीत भाजीपाला व अन्य किराणा साहित्य भरून विक्रीसाठी घेऊन जात असताना मोटार सुरू करताच अचानक मोटारीने पेट घेतल्याने त्यात शंभर टक्के भाजून रघुनाथ रामचंद्र ताटे (वय ५०,  शाहूनगर, विटा) या भाजी विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास शाहूनगर (विटा) येथे घडली.

विटा येथील रघुनाथ ताटे यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. भाजीपाला घेऊन जाण्यासाठी ते मारुती ८०० मोटारीचा (क्र.-एम.एच. ०१-व्ही-२४०९) चा वापर करतात. सोमवारी पहाटे भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तू मोटारीत भरून विक्रीसाठी जात होते. त्यांच्या घरासमोर त्यांनी मोटार सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी अचानक मोटारीतील वायरिंगने पेट घेऊन मोठा स्पोट झाला. त्यावेळी क्षणार्धात मोटारीत आगीचा भडका झाला. ताटे हे स्टेरिंगजवळ असल्याने गाडीतून त्यांना बाहेर येता आले नाही. तेथील नातेवाईक व स्थानिक लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. संपूर्ण मोटारीला आतील बाजूने आगीने वेढा दिल्याने भाजी विक्रेते रघुनाथ ताटे यांचा मोटारीतच भाजून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती नगरसेवक अजित गायकवाड यांनी विटा पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची पोलिसात नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक पी. के. कन्हेरे पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यूfireआग