शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

वसंतदादांना जयंतीदिनी सांगलीत अभिवादन, सर्वधर्मीय प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:53 PM

महाराष्ट्राचे  माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांच्या १0१ व्या जयंतीदिनी सांगलीत मंगळवारी स्मारकस्थळी अभिवादन कार्यक्रम पार पडला. वसंतदादांच्या कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी गर्दी केली होती.

ठळक मुद्देवसंतदादांना जयंतीदिनी सांगलीत अभिवादनसर्वधर्मीय प्रार्थना : उद्यापासून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

सांगली : महाराष्ट्राचे  माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांच्या १0१ व्या जयंतीदिनी सांगलीत मंगळवारी स्मारकस्थळी अभिवादन कार्यक्रम पार पडला. वसंतदादांच्या कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी गर्दी केली होती.कृष्णाकाठी वसंतदादांच्या स्मारकस्थळी सकाळी ९ वाजता अभिवादानाचा कार्यक्रम सुरू झाला. याठिकाणी सर्वधर्मीय प्रार्थना सादर करण्यात आली. वसंतदादांच्या जयंतीनिमित्त स्मारकाला फुलांनी सजविण्यात आले होते. स्टेशन चौकातील पुतळ््यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्मारकस्थळी सकाळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, जयश्रीताई पाटील, आनंदराव मोहिते, राजन पिराळे आदी उपस्थित होते. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती असल्याने विविध संस्थांमध्ये अभिवादनासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.वसंतदादा सांस्कृतिक महोत्सवास येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये संगीत, लोककला, गायन, विनोदी कार्यक्रम यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सहकार बोर्डातर्फे सहकार सप्ताहास मंगळवारपासून सुरुवात झाली.

सहकारी विपणन, प्रक्रिया व साठवणूक, सेंद्रीय शेटी व बिनखर्च शेतीकरीता सहकारी सुत्रे, सहकाराच्या माध्यमातून मुल्यवर्धन व ओळख, सार्वजनिक, खासगी सहकारी भागीदारी, सहकाराच्या माध्यमातून शासकीय योजना जागरूकता व उत्पन्न निर्मिती अशा विविध विषयांवर परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Vasantdada Patilवसंतदादा पाटीलSangliसांगली