सांगली : गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजयकाका पाटील यांच्याकडून दारुण पराभव पत्करावा लागलेल्या वसंतदादा घराण्याने यंदा पराभवाचे उट्टे काढण्याचा निर्धार केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर विशाल पाटील यांना रिंंगणात उतरविले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील, नगरसेविका रोहिणी पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्य प्रचारात उतरले आहेत.वसंतदादा पाटील, शालिनीताई पाटील, प्रकाशबापू पाटील, प्रतीक पाटील यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. प्रतीक पाटील यांचा गेल्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी पराभव केला. त्यांचे बंधू विशाल पाटील व संजयकाका यांच्यात सामना होत आहे. विशाल यांच्या प्रचारासाठी संपूर्ण वसंतदादा घराणे प्रचारात सक्रिय झाले आहे.
प्रचारामध्ये उतरलेय अवघे वसंतदादा घराणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:35 IST