नोकरी घोटाळ्यातून सुटण्यासाठीच वरदराज अपहरण नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:22 IST2019-06-07T22:20:09+5:302019-06-07T22:22:10+5:30

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालून अडचणीत आलेल्या पोलीस शिपाई सुनील कदम याने मामाकडून पैसे उकळण्यासाठी त्यांचा मुलगा वरदराज याच्या अपहरणाचा कट रचल्याचे तपासात

 Varadaraj kidnapping drama to escape from the job scandal | नोकरी घोटाळ्यातून सुटण्यासाठीच वरदराज अपहरण नाट्य

नोकरी घोटाळ्यातून सुटण्यासाठीच वरदराज अपहरण नाट्य

ठळक मुद्देसावकारांकडून पैसे उचलून कदम याने काहींची तोंडे बंद केली होती. मात्र त्यानंतर सावकारच त्याच्या पाठीशी लागल्याने सुनील कदम हा पूर्णपणे विक्षिप्त झाला होता.

इस्लामपूर : मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालून अडचणीत आलेल्या पोलीस शिपाई सुनील कदम याने मामाकडून पैसे उकळण्यासाठी त्यांचा मुलगा वरदराज याच्या अपहरणाचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

वरदराज बाळासाहेब खामकर (वय १0) याचे ३ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास कदम याच्या गडहिंग्लज परिसरातून आलेल्या तिघा साथीदारांनी अपहरण केले. यानंतर सुनील कदम हा बाळासाहेब खामकर हे काम करत असलेल्या महाविद्यालयात गेला. तेथे त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. यादरम्यानच त्याच्या ३ साथीदारांनी वरदराजचे अपहरण करुन कोल्हापूरकडे धूम ठोकली.

या घटनेनंतर मामासोबत प्रत्येक घडामोडीत सुनील कदम हा सहभागी झाला होता. यामुळे पोलीस तपासातील प्रत्येक घडामोडीची त्याला माहिती मिळत होती.

मोरे नावाच्या मित्रासमवेत मंत्रालयात नोकऱ्या लावण्याचे आमिष दाखवत कदम याने लाखो रुपये उकळले होते. मात्र संबंधितांना नोकºया न मिळाल्याने त्यांचा कदमकडे पैशासाठी तगादा सुरु होता. सावकारांकडून पैसे उचलून कदम याने काहींची तोंडे बंद केली होती. मात्र त्यानंतर सावकारच त्याच्या पाठीशी लागल्याने सुनील कदम हा पूर्णपणे विक्षिप्त झाला होता. त्यातूनच त्याने वरदराजचे अपहरण करुन किमान १५ लाख रुपये उकळण्याचा कट रचला. मात्र पोलिसांच्या सलग तपासामुळे कदम याला कोणतीही संधी न मिळाल्याने तो स्वत:च या जाळ्यात फसला आणि वरदराजचे हे अपहरण नाट्य ३६ तासानंतर संपुष्टात आले. सुनील कदम याच्यासह गोपाल गडदाकी व विलास वरई असे तिघे पोलीस कोठडीची हवा खात आहेत, तर यातील चौथा संशयित अद्याप फरार आहे. पोलीस निरीक्षक एन. एस. देशमुख अधिक तपास करत आहेत.

 

 

Web Title:  Varadaraj kidnapping drama to escape from the job scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.