शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरज विधानसभा लढविण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 16:30 IST

खाडे यांच्याविरोधात दमदार उमेदवार देण्याचे महाविकास आघाडीपुढे आव्हान

सदानंद औंधेमिरज : आगामी विधानसभा निवडणुकीत मिरजेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच बहुजन वंचित आघाडीने मिरजेची जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला तीन लाख मते मिळाली असल्याने सांगली लोकसभा व मिरज विधानसभेसाठी वंचितचा दावा आहे. यामुळे महाविकास आघाडीची अडचण होण्याची शक्यता आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज राखीव जागेवर भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. मिरजेची जागा ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मिरजेसाठी इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना देत आहेत. मात्र, महाविकास आघाडीत नसतानाही शिवसेनेसोबत असलेल्या वंचित आघाडीनेही मिरज विधानसभेवर हक्क सांगितल्याने शिवसेनेचीही अडचण होणार आहे. गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची तीन लाख मते व मिरज विधानसभा मतदारसंघात ३० हजारांवर मते मिळवली होती. यामुळे वंचित आघाडीने सांगली लोकसभेसाठी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे व मिरज विधानसभेसाठी युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे हे उमेदवार निश्चित करून तयारी सुरु केली आहे. गेल्या आठवड्यात डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत येऊन मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली. महिन्यापूर्वी सुजात आंबेडकर जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीत संघर्षाची चिन्हेमिरज राखीव मतदारसंघात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने वंचितने मिरजेवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत मिरजेच्या जागेवरून संघर्षाची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इच्छुकांना हा पेच सुटण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिरजेत सुरेश खाडे यांनी दोनवेळा शिवसेनेसोबत व एकदा सेनेशिवाय विजय मिळवून हॅटट्रिक साधली आहे. २०१९ मध्ये खाडे यांच्यासोबत शिवसेना होती, तेव्हा सर्व विरोधी पक्षांतर्फे बाळासाहेब होनमोरे एकच उमेदवार उभे होते. त्यामुळे खाडे यांचे मताधिक्य घटून ३० हजारांवर आले.

खाडेंविरोधात एकच उमेदवारभाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असताना वंचित आघाडीच्या उमेदवाराने स्वतंत्र निवडणूक लढविल्यास आघाडीची अडचण होणार आहे. वंचितमुळे तिरंगी लढत झाल्यास भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे भाजप विरोधात एकच दमदार उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणmiraj-acमिरजvidhan sabhaविधानसभाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा