शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

By संतोष भिसे | Updated: June 3, 2025 18:00 IST

हातात हॉकी स्टीक घेतलेले कार्यकर्ते दिसेल त्या साहित्याची तोडफोड करत सुटले होते

संतोष भिसेसांगली : कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून घेतले जात असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड करण्यात आली. सांगलीत विश्रामबागमध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. वंचित बहुजन आघाडीच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांनी आदित्य मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात धिंगाणा घातला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्यासह १७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. आज दुपारी रुग्णालयाचे दैनंदि कामकाज सुरु असताना हे कार्यकर्ते हातात निळे झेंडे घेऊन अचानक रुग्णालयात घुसले. स्वागतकक्षापासूनच तोडफोड सुरु केली. हातात हॉकी स्टीक घेतलेले कार्यकर्ते दिसेल त्या साहित्याची तोडफोड करत सुटले होते. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आक्रमक होते. त्यांनी स्वागतकक्ष फोडला. सोनोग्राफी कक्षात तोडफोड केली. तीन ते चार संगणकांची नासधूस केली. तळमजल्यावर धिंगाणा घातल्यानंतर त्यांनी पहिल्या मजल्यावर चाल केली. तेथेही नासधूस केली. त्यामुळे सर्वत्र काचांचा सडा पडला होता. त्यानंतर कार्यकर्ते दुसऱ्या मजल्याकडे धावले. तेथे आंतररुग्ण विभागात अनेक रुग्ण उपचार घेत होते. कार्यकर्त्यांचा पवित्रा लक्षात घेऊन रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब दाराला कुलूप लावून घेतले. त्यामुळे कार्यकर्ते खाली उतरले व निघून गेले. कार्यकर्त्यांनी आरोप केला की, कामगार विमा योजनेतून रुग्णालयात विनाशुल्क उपचार करणे आवश्यक आहे, पण या ठिकाणी रुग्णांकडून पैसे घेण्यात येतात. गोरगबीर रुग्णांकडून अशाप्रकारे पैसे उकळण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही. दरम्यान, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुधीर भालेराव पथकासह घटनास्थळी तातडीने पोहोचले. त्यांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. कायदा हाती घेण्याचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा इशारा दिला. रुग्णालयाच्या कामकाजाविषयी आक्षेप असतील, तर कायदेशिर मार्गाने जावे, अशी तोडफोड केल्यास कडक कारवाई करु असाही इशारा दिला. दरम्यान, धरपकड केलेल्या कार्यकर्त्यांना विश्रामबाग पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते. त्यांच्याविरोधात रुग्णालय प्रशासनाकडून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरु होती.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटलVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीCrime Newsगुन्हेगारी