शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

‘उदगिरी’ची ऊस वाहतूक रोखली

By admin | Updated: December 26, 2014 00:18 IST

मंगरूळ चिंचणीत प्रकार : रस्ते उखडल्याने ग्रामस्थ संतप्त

पारे : चिंचणी (मं.) येथील संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी रात्री सात वाजता उदगिरी शुगरची ऊस वाहतूक सुमारे दोन तास रोखून धरली. गेल्या दोन वर्षापासून बामणी-पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीमुळे चिंचणी (मं.) परिसरातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरूस्त करावेत, तसेच पारे तलावातून ओढ्यात सोडण्यात आलेले पाणी कारखान्याने उचलू नये, यासह विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या. यावेळी कारखाना प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. अखेर कारखान्याचे उपाध्यक्ष एन. एस. कदम यांनी तातडीने रस्ते दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.बामणी-पारे येथील उदगिरी शुगर अ‍ॅन्ड पॉवर या साखर कारखान्यासाठी कार्वे-चिंचणी ते बामणी आणि रिकाम्या गाड्यांसाठी बामणी ते मंगरूळमार्गे असा ऊस वाहतुकीचा मार्ग तयार केला आहे. या ऊस वाहतुकीमुळे कार्वे, मंगरूळ, चिंचणी, बामणी परिसरातील रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. चिंचणी येथील विद्यालयाजवळच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच पारे तलावातून रब्बी पिकांसाठी पाटबंधारे विभागाने ओढ्याला पाणी सोडले आहे. पारे हद्दीत ओढ्यालगत असलेल्या एका विहिरीतील पाणी कारखान्यासाठी वापरले जाते. त्यामुळे रब्बी पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे हे पाणीही तातडीने बंद करावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती.या पार्श्वभूमीवर बुधवारी चिंचणी (मं.) येथील संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी या मागण्यांसाठी विद्यालयाजवळ उदगिरी कारखान्याची ऊस वाहतूक सुमारे दोन तास रोखून धरली. त्यावेळी प्रशासन अधिकारी अमोल पाटील पोलीस कुमक घेऊनच घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे ग्रामस्थ जास्तच आक्रमक झाले. कारखान्याच्या उपाध्यक्षांनाच बोलवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यानंतर तासाभरानंतर उपाध्यक्ष कदम आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य करीत तातडीने रस्त्यांची दुरूस्ती करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रोखून धरलेली ऊस वाहतूक पूर्ववत सुरू झाली. यावेळी चिंचणी येथील सरपंच शिवाजीराव निकम, किसन निकम, बालाजी निकम, विकास शिंदे, कुमार निकम उपस्थित होते. (वार्ताहर)आश्वासनानंतर वाहतूक सुरळीतउदगिरी कारखान्याची ऊस वाहतूक सुमारे दोन तास रोखून धरली. यावेळी प्रशासन अधिकारी अमोल पाटील पोलीस कुमक घेऊनच घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे ग्रामस्थ जास्तच आक्रमक झाले. कारखान्याच्या उपाध्यक्षांनाच बोलवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यानंतर तासाभरानंतर उपाध्यक्ष कदम आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य करीत तातडीने रस्त्यांची दुरूस्ती करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रोखून धरलेली ऊस वाहतूक पूर्ववत सुरू झाली.