शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या तिकिटावरून ‘यूपी’तील महिलेच्या खुनाचा छडा लागला, पती-सासऱ्याला अटक, धक्कादाक कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 19:09 IST

Sangli Crime News: बोलवाड (ता. मिरज) येथे कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रेल्वेच्या तिकिटावरून उलगडले.

सांगली : बोलवाड (ता. मिरज) येथे कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रेल्वेच्या तिकिटावरून उलगडले. मृत महिलेचे नाव नितू ऊर्फ शालिनी आकाश यादव (वय ३५) असे असून, ती उत्तर प्रदेशातील आहे. तिचा दुसरा पती आकाश ऊर्फ विशाल दीनदयाळ यादव (२४) आणि सासरा दीनदयाळ रामबाली यादव (५५, दोघेही रा. खुज्झी, ठाणा चंन्दवक, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) या दोघांनी चारित्र्याचा संशय, पोलिसात दिलेल्या तक्रारीमुळे तिला इकडे आणून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, बोलवाड येथे दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी कुमार पाटील यांच्या उसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा डोक्याकडील भाग प्राण्यांनी खाल्ल्याने आणि तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटली नाही. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली. पुरावे काहीच नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे समांतर तपास दिला. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना घटनास्थळाजवळ पुणे ते मिरज दरम्यानचे रेल्वे तिकीट सापडले. त्यामुळे तिकिटावरून तपास सुरू झाला. तिकीट दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी पुणे रेल्वे स्थानकावर काढल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी मिरज रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृत महिलेच्या अंगावरील साडी आणि शाल पांघरलेल्या महिलेसोबत दोन पुरुष सीसीटीव्हीत दिसले. फुटेज पोलिसांनी स्थानिक दुकानदार, रिक्षाचालक, फेरीवाले व हमालांना दाखविले. रेल्वे स्थानकावरील एका चिक्की विक्रेत्याने महिला आणि दोन पुरुषांना ओळखले. तिघांकडे पैसे नसल्याने एकाने नातेवाइकांकडून ऑनलाइन तीन हजार माझ्यामार्फत मागवून घेतल्याचे सांगितले. एका रिक्षाचालकाने तिघांना टाकळी गावाजवळील ओढ्याजवळ सोडल्याचे सांगितले.

अधीक्षक घुगे पुढे म्हणाले, गुन्हे अन्वेषणच्या तांत्रिक तपासात दोन संशयित मोबाइल क्रमांक निष्पन्न झाले. ते जौनपूर जिल्ह्यातील असल्याचे समजले. त्यामुळे पोलिस पथके उत्तर प्रदेश व हरियाणा येथे रवाना झाली. सीसीटीव्हीतील दोघेजण आकाश ऊर्फ विशाल यादव आणि दीनदयाल यादव असल्याचे समजले. कसून तपास केल्यानंतर मृत महिला नीतू हिचे आकाश यादवशी दुसरे लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांच्यात सतत वाद सुरू होते. तसेच तिने पहिले लग्न लपवून ठेवल्याचे आकाशला समजले. सासरी वाद होत असल्याने ती सतत माहेरी जात होती. त्यामुळे चारित्र्याबाबत आकाशला संशय होता. कौटुंबिक वादातून तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे तिचा काटा काढण्याचे ठरवले. आकाश आणि दीनदयाळ यांनी नीतू हिला दुसरीकडे राहण्यास जायचे असल्याचे सांगून उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर रेल्वे स्थानकावर आले. तेथून पुण्याला आणले. दि. १६ डिसेंबरला तिघे मिरजेत उतरले. सायंकाळी टाकळीजवळील उसाच्या शेतात शालीने गळा आवळून नीतूचा खून केला. मृतदेह शेतात टाकून बापलेक मिरजेतून उत्तर प्रदेशकडे पसार झाले. आठ दिवसांत याचा छडा लावला. यावेळी अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे उपस्थित होते.

कट रचून खून केलादीनदयाळ याने मालगाव येथील म्हशीच्या गोठ्यात पूर्वी काम केले होते. परिसराची त्याला माहिती होती. युपीतून महाराष्ट्रात येऊन खून केला तर तो तत्काळ उघडकीस येणार नाही याची खबरदारी घेतली होती. परंतु, तिकिटावरून खुनाचा प्रवास उलगडला.

पथकाचा कसून तपासउपअधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक झाडे, निरीक्षक अजित सिद, सहायक निरीक्षक रणजित तिप्पे, उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार, अंमलदार इम्रान मु्ला, संकेत मगदूम, प्रमोद साखरपे, सुशील मस्के, श्रीधर बागडी, रूपेश होळकर, सुमित सूर्यवंशी, अतुल माने, रणजित जाधव, गणेश शिंदे, सुनील देशमुख, अभिजित पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने कसून तपास केला.

परप्रांतात जाऊन तळ ठोकलापोलिस पथकाने हरियाणा येथून पती आकाश यादव, तर उत्तर प्रदेशातील खुज्झी येथून सासरा दीनदयाळ यादव याला जेरबंद केले. कसून तपास केल्यानंतर त्यांनी कबुली दिली. काही दिवस पथक हरियाणा, उत्तर प्रदेशात तळ ठोकून होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Railway Ticket Unravels UP Woman's Murder; Husband, Father-in-Law Arrested

Web Summary : A railway ticket led to solving a woman's murder in Sangli. The victim, from Uttar Pradesh, was killed by her husband and father-in-law due to suspicions about her character and a police complaint. Both have been arrested.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली