शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

वारणा योजनेसाठी एकजुटीने आंदोलन : नगराध्यक्षा अलका स्वामी यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:52 IST

इचलकरंजी : वारणा नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी यापूर्वी आमदार ते पालकमंत्री आणि तहसीलदार ते जिल्हाधिकारी पातळीवर अनेक बैठका होऊनही वारणा बचाव कृती समितीचा विरोध कायम आहे

ठळक मुद्देएकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

इचलकरंजी : वारणा नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी यापूर्वी आमदार ते पालकमंत्री आणि तहसीलदार ते जिल्हाधिकारी पातळीवर अनेक बैठका होऊनही वारणा बचाव कृती समितीचा विरोध कायम आहे. मात्र, साडेतीन लाख लोकसंख्येच्या इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतूनच पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी एकजुटीने आंदोलन केले जाईल. त्याला सर्व पक्ष, आघाड्या, संघटना, आदींसह नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांनी केले.अमृत शहर योजनेतून अनुदान मिळालेल्या वारणा नळ पाणी योजनेला दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा बचाव कृती समितीचा जोरदार विरोध होत आहे. मात्र, इचलकरंजीवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गैरसमजुतीतून होणारा विरोध मोडून काढण्यासाठी बुधवारी नगरपालिका सभागृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत नगराध्यक्षा स्वामी बोलत होत्या. बैठकीच्या सुरुवातीला शीतल पाटील यांनी स्वागत व भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात पोवार यांनी बैठकीचा उद्देश व्यक्त केला.नगरपालिकेकडील पाणीपुरवठा समितीचे माजी सभापती विजय जगताप म्हणाले, सन १९८६ पासून इचलकरंजी शहराकरिता वारणा धरणामध्ये एक टीएमसी पाणी आरक्षित आहे. मात्र, आंदोलकांनी कोणतीही तांत्रिक माहिती न घेता निव्वळ आंधळेपणाने विरोध सुरू केला आहे. शामराव कुलकर्णी म्हणाले, वारणा नदीतून पिण्याचे पाणी मिळणे, हा हक्क आहे. सर्वांनी एकजुटीने आंदोलन उभारले पाहिजे.अ‍ॅड. जवाहरलाल छाबडा म्हणाले, वारणा नळ योजनेला होणारा विरोध राजकीय आहे. वारणा नळ योजनेबाबत झालेला गैरसमज दूर करण्यासाठी शासनाने माजी न्यायाधीशांची एक सदस्यीय समिती नेमावी. अहमद मुजावर म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडूनच दानोळी येथील वारणा योजना मंजूर केली आहे. योजनेची जबाबदारी घेऊन प्रशासनाने ती पूर्ण करावी.जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे म्हणाले, इचलकरंजीकरांना पाणी दिल्यास वारणाकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल, असा निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते, आदींनी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. अशोक स्वामी म्हणाले, इचलकरंजीकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आता वारणा नदीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे निव्वळ गैरसमज निर्माण करून पिण्याचे पाणी थांबविता येणार नाही. ततत्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून पाणी मिळण्याकरिता आंदोलन हाती घेण्यात यावे.बैठकीत विठ्ठल चोपडे, अजित जाधव, प्रकाश मोरबाळे, अशोक जांभळे, विनायक कलढोणे, अभिजित पटवा, राजन मुठाणे, बजरंग लोणारी, शिवाजी साळुंखे, बाबा नलगे, नितीन लायकर, मिश्रीलाल जाजू, गजानन महाजन, राहुल खंजिरे, नितीन कोकणे, आदींनी आपले विचार मांडले.वारणा धरण प्रकल्पामुळे नदीत मुबलक पाणीवारणा धरण प्रकल्पात नेहमीच ३४.५ टीएमसी पाणी साठविले जाते. त्यापैकी ७.५ टीएमसी पाणी विनावापर पडून राहते. सन २०१६ मध्ये मान्सून पावसाने ओढ दिल्यामुळे नदीकाठावरील गावांसाठी पाणी उपसा बंद करण्यात आला होता, असे सांगून नगरसेवक शशांक बावचकर म्हणाले, हा अपवाद वगळता गेल्या ३०-३५ वर्षांत एकवेळ सुद्धा पाणी उपसा बंद करण्यात आला नाही. इतके मुबलक पाणी वारणा नदीतून मिळते. त्यामुळे इचलकरंजीला पाणी दिल्यास वारणा नदीमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल, असा करण्यात आलेला गैरसमज अत्यंत चुकीचा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी