मायणी येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणींना अज्ञात वाहनाची धडक; १ जागीच ठार तर १ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 09:21 IST2021-08-03T09:21:28+5:302021-08-03T09:21:40+5:30

मायणी पक्षी आश्रयस्थानाजवळची घटना, १ जखमी असून तिला पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून पुढे पाठविण्यात आले आहे.

An unidentified vehicle hit a Girl who had gone for a morning walk at Mayani Vita,1 Death | मायणी येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणींना अज्ञात वाहनाची धडक; १ जागीच ठार तर १ जखमी

मायणी येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणींना अज्ञात वाहनाची धडक; १ जागीच ठार तर १ जखमी

संदीप कुंभार

मायणी : मायणी तालुका खटाव पक्षी आश्रयस्थान परिसरात माॅर्निंग वाॅकसाठी गेलेल्या गेलेल्या मुलींना अज्ञात वाहनाने धडक दिली. या मध्ये  विद्या राजकुमार हिंगसे वय १८ वर्षे ही जागीच ठार झाली.तर तिच्या सोबत असणारी दिव्या काशिनाथ तोडकर वय १५ वर्षे या  दोघी रा.मायणी तालुका खटाव ही जखमी असून तिला पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून पुढे पाठविण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलीस पाटील यांच्या कडून मिळालेली अधिक माहिती येथील नवीपेठ , श्री. सद्गुरू सरुताई माऊली मठाच्या परिसरात राहणाऱ्या मुली  मॉर्निंग वॉकसाठी येथील पक्षी आश्रयस्थान परिसरामध्ये पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गेला होता त्या पक्षी आश्रयस्थान परिसरात आल्यानंतर अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेमध्ये विद्या राजकुमार हिंगसे वय १८ वर्षे  तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे ती जागीच ठार झाली.

तर तिच्यासोबत असलेल्या इतर महिला व मुलींमधील दिव्या काशिनाथ तोडकर वय १५ वर्षे ही गंभीर जखमी झाली तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयातुन विटा जिल्हा सांगली येथे पाठविण्यात आले आहे.

Web Title: An unidentified vehicle hit a Girl who had gone for a morning walk at Mayani Vita,1 Death

टॅग्स :Accidentअपघात