शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Sangli: अंडी खरेदीचा बहाणा, आटपाडीतील वृद्ध महिलेस भरदिवसा पळवून नेऊन लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 13:05 IST

अंडी विकत बसलेल्या वृद्ध महिलेकडे संबंधित अनोळखी इसम आला व त्याने अंडी घ्यायची आहेत असा बहाणा करुन पळवून नेऊन लुबाडले

आटपाडी : आटपाडी येथे ८३ वर्षीय वृद्ध महिलेला अंडी खरेदी करण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून पिंपरी खुर्द येथील वनक्षेत्रात नेऊन अंगावरील दागिने व रोख रकमेसह साहित्य लुटल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद जनाबाई सुखदेव नागरे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. शनिवारी (दि.४) ही घटना घडली.आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जनाबाई सुखदेव नागरे (वय ८३ या. नांगरेमळा ता. आटपाडी जि. सांगली) या शनिवारी दुपारी आटपाडी येथील थिएटर चौकात अंडी विकत होत्या. यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला व त्याने अंडी घ्यायची आहेत असा बहाणा केला.त्याने आणलेल्या स्प्लेंडर गाडीवर बसवून गुलाल कलेक्शन रोडने देशमुखवाडीवरून पिंपरी खुर्द येथे वनविभागाच्या हद्दीत नेले.तेथे त्याने जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, बोरमाळ, वायरच्या पिशवीत ठेवलेले सात हजार रुपये आधारकार्ड, रेशनकार्ड व अंडी यासह पिशवी काढून घेतली. त्या ओरडत असताना त्याने उजव्या कानातील फुले, वेल व झुबे हिसका मारून ओढले. त्यामुळे त्यांच्या उजव्या कानाला दुखापत झालेली आहे.यामध्ये ७ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे पिवळ्या धातूचे मणी-मंगळसूत्र, ५ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाची पिवळ्या धातूची बोरमाळ, ५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे एका कानातील पिवळ्या धातूचे वेल, फुले, झुबे, ७ हजार रुपये रोख रक्कम व दीडशे रुपयांची कोंबडीची अंडी असा एकूण २४ हजार १५० रुपयांचा ऐवज लंपास केला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस