शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
4
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
5
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
6
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
7
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
8
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
9
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
10
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
11
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
12
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
13
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
14
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
15
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
16
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
17
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
18
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
19
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
20
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने लेकीचाही मृत्यू, सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:15 IST

हृदय पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना

रेठरे धरण : असे म्हणतात की प्रत्येकाला एक तरी मुलगी असावी, आई व बापाच्या सुख आणि दुःखात मुलापेक्षा मुलगीच जास्त सहभागी असते याची प्रचिती एका दुख:द घटनेने आली. सुरूल (ता. वाळवा) येथे हृदय पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली. माहेरी येऊन वडिलांचे पार्थिव दर्शन घेण्यास आलेल्या सविता प्रेमानंद चव्हाण (वय ३९) यांना वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एका दिवसात वडील आणि मुलगी या दोघांच्या जाण्याने सुरूल व कुंभारगाव परिसरात शोककळा पसरली आहे.सुरूलचे प्रतिष्ठित नागरिक गणपती बंडू वायदंडे (वय ८०) यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ही बातमी समजताच त्यांची विवाहित मुलगी सविता चव्हाण आपल्या माहेरी धावत आली. मात्र, वडिलांचे पार्थिव पाहताच त्यांना झालेल्या मानसिक धक्क्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि काही क्षणातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही घटना पाहून उपस्थित नातेवाईक, महिला आणि गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. गणपती वायदंडे यांच्यावर सुरूल येथे तर सविता चव्हाण यांच्यावर कुंभारगाव येथील सासरी अंत्यसंस्कार करण्यात आले. वायदंडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी तर सविता यांच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. एका कुटुंबावर ओढावलेला हा दुहेरी आघात सर्वांना स्तब्ध करणारा ठरला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Daughter dies of shock after father's death in Sangli.

Web Summary : In a tragic incident in Sangli, a daughter, Savita Chavan (39), died of a heart attack after seeing her father's body. Her father, Ganpati Waydande (80), had passed away due to illness. The double loss has plunged the villages of Surul and Kumbhargaon into mourning.