शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

उदयनराजे, मानकुमरेंचे कार्यकर्ते भिडले!

By admin | Published: February 21, 2017 11:23 PM

गाड्यांची तोडफोड; मानकुमरे यांच्या पत्नीसह पोलिस जखमी; आज जावळी तालुका बंद

मेढा/सायगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू असतानाच दुपारी चारच्या सुमारास खर्शी बारामुरे, ता. जावळी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत मानकुमरे यांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर मानकुमरेंच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. यामध्ये पोलिस गाडीसह दोन गाड्यांच्या काचा फुटल्या. तसेच एक पोलिस व गाडीतील कार्यकर्ते जखमी झाले. दरम्यान, आपल्या पत्नीसह कार्यकर्त्यांनाही उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप मानकुमरे यांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या कार्यकर्त्यांसह मतदान केंद्राला भेट देण्यासाठी जावळी तालुक्यातील खर्शी बारामुरे येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते परतत असताना उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांकडे रागाने पाहिल्याचे सांगत संबंधिताने मानकुमरे यांच्या एका कार्यकर्त्याला दांडके घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी उपस्थित असलेले मानकुमरे पुढे सरसावले, तेव्हा बाचाबाचीत एक कार्यकर्ता मानकुमरे यांच्यावर दांडक्याने मारहाण करणार तोच त्यांच्या पत्नी जयश्री मानकुमरे मध्ये पडल्या. यावेळी त्या व त्यांचे कार्यकर्ते जखमी झाले.त्यानंतर मानकुमरे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांभोवती जमला. शेजारी असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यातून दगडे उचलून गाड्यांवर भिरकाविण्यास प्रारंभ झाला. या दगडफेकीत पोलिस गाडीसह दोन गाड्यांच्या काचा फुटल्या. एक पोलिस व गाडीतील कार्यकर्ते जखमी झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मेढा पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (वार्ताहर) शिवेंद्रसिंहराजे मेढ्यात तळ ठोकून!या घटनेची माहिती मिळताच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले करहर पोलिस ठाण्यात येऊन आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी शांततेचे आवाहन केले. या घटनेची माहिती काही क्षणात संपूर्ण जावळी तालुक्यात पसरली. त्यामुळे शेकडो कार्यकर्ते करहर पोलिस ठाण्यापुढे जमा झाले. त्यामुळे याठिकाणीही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.पोलिस मुख्यालयासमोर उदयनराजेंच्या समर्थकांची गर्दी !खर्शी येथे खासदार उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याचे समजताच साताऱ्यात पोलिस मुख्यालयावर खासदार समर्थक मोठ्या संख्येने जमले. राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव मानकुमरे यांना अटक करावी, अशी मागणी कार्यकर्ते करत होते. संतप्त कार्यकर्त्यांचा आवेश पाहून पोलिसांनीही मुख्यालयासमोर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. उदयनराजे यांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांसह पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन मानकुमरेंवर तत्काळ कारवाईची मागणी केली.