शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार, मिरजेत भोंदू वैद्य व एजंटांचा महिलेला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:20 IST

, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मिरज : मिरजेत उपचारासाठी येणाऱ्या कर्नाटकातील रुग्णांना आयुर्वेदिक उपचाराच्या बहाण्याने गंडा घालण्याचे प्रकार सुरू आहेत. या भोंदू वैद्य व एजंटांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.मिरजेत कर्नाटकातून व परजिल्ह्यातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. बसस्थानक व रेल्वे परिसरातील एजंट अशा रुग्णांना हेरून आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली त्यांची फसवणूक करीत आहेत. रुग्णांना गाठून दवाखान्यात महागड्या उपचारापेक्षा रामबाण आयुर्वेदिक उपचाराने आजार बरा करण्याची खात्री देण्यात येते. यासाठी भोंदू वैद्यांनी बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात आयुर्वेदिक औषधाची दुकाने थाटली आहेत. एजंट रुग्णांना अशा दुकानात घेऊन गेल्यानंतर दुकानदार कोणताही रोग हमखास बरा होण्याचे औषध देतात. या आयुर्वेदिक औषधांसाठी १० ते १५ हजार रुपये उकळण्यात येतात. अशा औषधांचा कोणताही फायदा होत नाही. मात्र, याबाबत तक्रार करणाऱ्या रुग्णांना दमदाटी करून पिटाळून लावण्यात येते.गरीब व अशिक्षित रुग्णांची अशी दररोज फसवणूक सुरू आहे. दुकाने थाटून बसलेले भोंदू वैद्य व एजंट परजिल्ह्यातील आहेत. बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात कंगवा व इतर साहित्य विक्रीच्या बहाण्याने बसलेल्या एजंट महिला गरीब रुग्णांना उपचाराबाबत भूलथापा देऊन आयुर्वेदिक उपचाराची गळ घालत आहेत.दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातील मंगसुळी येथून डोळ्याच्या उपचारासाठी आलेल्या गरीब वृद्ध महिलेस आयुर्वेदिक उपचाराच्या बहाण्याने गंडा घालण्यात आला. फसवणूक झालेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशा पद्धतीने वारंवार रुग्णांना फसविण्याचे प्रकार सुरू आहेत.

रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्रीचा बहाणामिरजेतील स्टेशन चौक ते पुढे बस स्थानकापर्यंत रस्त्यावर किरकोळ वस्तू घेऊन विक्रेत्या म्हणून बसलेल्या महिला रस्त्यावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आजारावर औषध मिळते, असे सांगतात. तेथून दुकानात नेल्यावर गंडा घालणारा भोंदू वैद्य तयारच असतो. कोणत्याही आजारावर तेथे औषधं मिळते. स्वस्तात औषधं असल्याचे सांगून वेगवेगळी औषधं पूड एकत्र करण्यात येते. संबंधित रुग्नाच्या व्याधीसाठी औषध तयार केल्यानंतर त्याची किमत हजारात होते. तयार केलेले औषध घ्यावेच लागेल , अशी सक्ती करण्यात येते. एखादी तक्रार पोलिसांत गेल्यास औषधासाठी घेतलेली रक्कम रुग्णास परत देऊन प्रकरण मिटविण्यात येते.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीHealthआरोग्यCrime Newsगुन्हेगारीmiraj-acमिरज