शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दुचाकी-कारची समोरासमोर धडक, अपघातात बेणापूरचे दोघे तरूण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 16:16 IST

एकजण गंभीर जखमी 

पांडुरंग डोंगरे खानापूर : गुहागर - विजापुर राष्ट्रीय महामार्गावर खानापूर येथे दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बेणापूर (ता. खानापूर) येथील दोन तरुण जागीच ठार झाले. हा अपघात काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास खानापूर जवळ भिवघाट रोडवर घडला. रुपेश शेखर गायकवाड (वय २८) व सुमित प्रविण धेंडे (१४, दोघे रा. बेणापूर ता. खानापूर जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. तर अश्वजित दाजी धेंडे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचुर झाला.बेणापूर येथील रुपेश गायकवाड हा दोन मित्रांसह खानापूरकडून बेणापूरकडे दुचाकीवरून (एम. एच. १०-डी.आर-७२४१) निघाला होता. यावेळी भिवघाटकडून खानापूरकडे येणारी भरधाव मोटार (क्र. एपी-०७-सीएम-५६६५ ) व रुपेश गायकवाड याच्या दुचाकीची धन निरंकार सत्संग भवनजवळ समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील रुपेश गायकवाड व सुमित धेंडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अश्वजित धेंडे हा गंभीर जखमी झाला.जखमी अश्वजित याच्यावर भिवघाटच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करंजे ग्रामीण रुग्णालयात पाठवले.मयत रूपेश गायकवाड हा विवाहित आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली आहेत. तर मयत सुमित धेंडे इयत्ता नववीमध्ये शिकत होता. या अपघाताची बातमी खानापूर घाटमाथ्यावर आज, मंगळवारी सकाळी पसरली. दोन तरुणांचा अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू