शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

अलमट्टीतून दोन लाख क्युसेकने विसर्ग, सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप; कृष्णेची पातळी २५ फुटांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 11:32 IST

वारणा धरणातून ९४४८ क्युसेकने विसर्ग सुरू झाल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले

सांगली : जिल्ह्यात काल, बुधवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती; पण शिराळा तालुक्यासह वारणा (चांदोली) धरण परिसरात मात्र पाऊस सुरू आहे. यामुळे वारणा धरणातून ९४४८ क्युसेकने विसर्ग सुरू झाल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असून बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा नदीची दिवसात पाच फुटाने पाणीपातळी वाढून २५ फुटांवर गेली आहे. नागठाणे, कसबे डिग्रज बंधारे पाण्याखाली गेले आहेत.शिराळा, वाळवा  तालुक्यांत किरकोळ पाऊस झाला आहे. उर्वरित तालुक्यात बुधवारी पावसाने उघडीप दिली होती. वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात मात्र अतिवृष्टी सुरूच आहे. बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासात १३८ मिलिमीटर तर दिवसभरात २० मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणातं ३१.०५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ९१ टक्के भरले आहे. यामुळे ९४४८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून सात पूल पाण्याखाली गेले आहेत.कोयना धरण क्षेत्रातही अतिवृष्टी सुरूच आहे. कोयना धरणात ८०.४५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ७६ टक्के भरले आहे. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

अलमट्टीतून दोन लाख क्युसेकने विसर्गअलमट्टी धरणामध्ये १२३ टीएमसी पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. मंगळवारी धरणात ११७.५४ टीएमसी पाणीसाठा होता. धरणात एक लाख दोन हजार १८६ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. यामुळे बुधवारी सायंकाळी पाचनंतर दोन लाख क्युसेकने विसर्ग सुरू करून दोन टीएमसीने पाणीसाठा कमी करून सध्या ११५.५४ टीएमसी ठेवला आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढविण्याची अलमट्टी जलसंपदा प्रशासनाने तयारी ठेवली आहे.

धरणातील पाणीसाठाधरण       क्षमता      सध्याचा पाणीसाठी   टक्केवारीअलमट्टी    १२३          ११५.५४               ९३.८८कोयना     १०५.२३      ८०.४५                ७६वारणा     ३४.२०        ३१.०५                 ९१

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDamधरण