विटा येथे पिकअप-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:40 IST2020-02-19T13:39:03+5:302020-02-19T13:40:09+5:30
तासगावहून विट्याकडे येत असलेली दुचाकी आणि विट्याहून तासगावकडे निघालेला पिकअप टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेसह दोघेजण ठार झाले. तर एक तरूण गंभीर जखमी झाला.

विटा येथे पिकअप-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार
ठळक मुद्देविटा येथे पिकअप-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठारमृतात महिलेचा समावेश : तरूण गंभीर जखमी
विटा : तासगावहून विट्याकडे येत असलेली दुचाकी आणि विट्याहून तासगावकडे निघालेला पिकअप टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेसह दोघेजण ठार झाले. तर एक तरूण गंभीर जखमी झाला.
संदीप संभाजी मदने (३६, रा. बोरगाव, ता.तासगाव) व जयश्री रमेश माघाडे (४२, रा. लेंगरे रोड, विटा) अशी ठार झालेल्या दोघांची नावे असून अजय अंकुश मदने (१८, रा. बोरगाव) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास विटा शहराजवळ तासगाव रस्त्यावरील कमानीजवळ झाला.